-
स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी मुंढेकर.
-
‘मुरांबा’ मालिकेत शिवानी रमा या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
-
मालिकेत शिवानीचा सध्याचा लूक बदलला असला तरी, सुरुवातीला तिची ‘दोन वेण्या’ अशी ओळख होती.
-
मालिकेत दोन वेण्या म्हणून लोकप्रिय असलेली रमा अर्थात शिवानी खऱ्या आयुष्यात तितकीच ग्लॅमरस आहे.
-
शिवानी सोशल मीडियावर कायमच तिचे विविध लूकमधील फोटो शेअर करीत असते.
-
अशातच शिवानीने लाल रंगाच्या साडीमधील खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिचा रॉयल अंदाज पाहायला मिळत आहे.
-
लाल सिल्क साडी, मोकळे केस आणि कानात मोठे झुमके असा खास लूक शिवानीने केल्याचं या फोटोंमधून दिसत आहे.
-
शिवानीने शेअर केलेले हे मनमोहक फोटो केवळ तिच्या चाहत्यांच्याच, नव्हे तर कलाकारांच्या सुद्धा चांगलेच पसंतीस पडले आहेत. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
‘सुंदरी’, ‘गोंडस’, ‘किती गोड दिसत आहेस’ या आणि अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी शिवानीच्या फोटोवर व्यक्त केल्या आहेत.
शिवानी मुंढेकरचा रॉयल अंदाज, लाल रंगाच्या साडीत खुललं मनोहक सौंदर्य; लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस
शिवानी मुंढेकरने शेअर केले लाल साडीतील खास फोटो, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Web Title: Muramba fame shivani mundhekar flaunts her elegant look in traditional red saree with bold jewellery ssm 00