-
शोले चित्रपटात जेलरची भूमिका साकरणारे असरानी काळाच्या पडद्याआड गेले आहेत. या निमित्ताने शोलेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. या चित्रपटातील ठाकूर पासून सांबा, कालिया पर्यंत अनेक कलाकार काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
-
शोले चित्रपटातील जेलर साकारणारे असरानी यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या सिनेमाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
-
शोले चित्रपटात ठाकूर बलदेव सिंग ही भूमिका साकारणारे संजीव कुमार आता या जगात नाहीत. त्यांचा मृत्यू ६ नोव्हेंबर १९८५ ला झाला.
-
शोले चित्रपटात गब्बर सिंग ही भूमिका साकारणाणारे आणि जगणारे अभिनेते म्हणजे अमजद खान. १९९२ मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.
-
शोले चित्रपटात सूरमा भोपाली हे पात्र साकारणाऱ्या जगदीप यांनीही २०२० मध्ये जगाचा निरोप घेतला.
-
शोले चित्रपटात कालियाची भूमिका करणाऱ्या विजू खोटे यांनीही २०१९ मध्ये जगाचा निरोप घेतला.
-
शोले चित्रपटातील सांबा हे पात्र साकारणारे मॅक मोहन हेदेखील २०१० मध्ये काळाच्या पडद्याआड गेले.
-
शोले चित्रपटात हरिराम नाई हे पात्र साकारणारे केश्तो मुखर्जी यांनीही १९८२ मध्ये जगाचा निरोप घेतला. (सर्व फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
-
शोले चित्रपटात मौसीचं पात्र साकारणाऱ्या लीला मिश्रा यांचंही १९८८ मध्ये निधन झालं.
-
शोले चित्रपटात इमाम चाचा हे पात्र साकारणाऱ्या ए. के. हंगल यांनीही जगाचा निरोप २०१२ मध्ये घेतला.
-
रामलाल हे पात्र शोले चित्रपटात साकणाऱ्या सत्येन कपूर यांनीही २००७ मध्ये जगाचा निरोप घेतला.
‘शोले’तला ‘जेलर’च नाही ‘ठाकूर’, ‘गब्बर’सह चित्रपटातले ‘हे’ कलाकार काळाच्या पडद्याआड
शोले हा भारतीय सिनेसृष्टीतला अजरामर चित्रपट आहे. या चित्रपटातील अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे.
Web Title: Sholey movie jailer asrani no more this iconic fim has so many artists from amjad khan to viju khote death scj