-

‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोच्या माध्यमातून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री श्रेया बुगडे.
-
श्रेया सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
-
अशातच श्रेयानं काही दिवसांपूर्वी कुलदेवीच्या दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
दिवाळीच्या सणात श्रेया आई-वडील आणि नवऱ्यासह कुलदेवीच्या दर्शनाला गेली होती.
-
गोव्यातील नानोडा या ठिकाणी श्रेयाची कुलदेवी आहे आणि शांतादुर्गा असं या कुलदेवीचं नाव आहे.
-
श्रेयानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत कुलदेवीचं भव्य मंदिर पाहायला मिळत आहे.
-
श्रेया सध्या ‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
या सीझनमध्ये श्रेयासह गौरव मोरे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि प्रियदर्शन जाधवही आहेत
‘या’ ठिकाणी आहे ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेच्या कुलदेवीचं मंदिर; पाहा फोटो…
श्रेया बुगडेने सोशल मीडियावर शेअर केले कुलदेवीच्या दर्शनाचे फोटो
Web Title: Chala hawa yeu dya fame actress shreya bugde shares photos of kuldevi in goa ssm 00