-

अभिनेत्री रेश्मा शिंदेने यंदा लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली. यासाठी ती खास सासरी गेली होती, याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
आता रेश्माने घरी पार पडलेल्या तुळशी विवाह सोहळ्याची झलक चाहत्यांना फोटोंच्या माध्यमातून दाखवली आहे.
-
“आमच्या तुळशीचं लग्न…भक्तीचा सण, प्रेमाचा आरंभ आणि शुभत्वाचं प्रतीक. तुळशीविवाहाच्या शुभप्रसंगी सर्वांना मंगलमय शुभेच्छा!” असं कॅप्शन रेश्माने या फोटोंना दिलं आहे.
-
रेश्माने तुळशीच्या लग्नासाठी अबोली रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता. या पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसतेय.
-
तर, रेश्माचा पती पवनने गडद निळ्या रंगाचा सदरा घालून बायकोला कॉन्ट्रास्ट मॅचिंग केल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांनी यानिमित्ताने घरच्या घरी छान फोटोशूट केलं आहे.
-
रेश्माने तुळशी विवाहासाठी खास तयारी केली होती. यातील काही फोटोंमध्ये रेश्माच्या घरच्या दिवाळी कंदिलाची झलक देखील पाहायला मिळतेय.
-
हा सुंदर कंदील रेश्माला अभिनेत्री तितीक्षा तावडेने भेट दिला आहे. रेश्माने पोस्टच्या कॅप्शनमध्ये तितीक्षाला टॅग करत या सुंदर कंदिलासाठी तिचे आभार मानले आहेत.
-
तर रेश्माच्या गळ्यातील सुंदर मंगळसूत्राने सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
रेश्माचं हे मंगळसूत्र ‘पालमोनास’ (Palmonas) या तिच्या स्वत:च्या ज्वेलरी ब्रँडचं आहे.
तुळशीचं लग्न! ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने रेश्मा शिंदेला दिवाळीनिमित्त दिलं खास गिफ्ट, गळ्यातील सुंदर मंगळसूत्राने वेधलं लक्ष
रेश्मा शिंदेच्या घरी ‘असा’ पार पडला तुळशी विवाह, शेअर केले खास फोटो…
Web Title: Reshma shinde celebrate tulsi vivah wearing own brand mangalsutra and kandil gifted by this actress sva 00