-

‘बिग बॉस मराठी’चा विजेता सूरज चव्हाण लवकरच बोहल्यावर चढणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सूरजने ही आनंदाची बातमी सर्वांना दिली होती.
-
मात्र, अद्याप सूरजने त्याच्या बायकोचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हिल केला नव्हता. सूरजची होणारी बायको नेमकी कोण आहे? हे पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक होते. अखेर ‘गुलीगत किंग’ने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
लग्न ठरल्यावर सूरजला भेटण्यासाठी ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर त्याच्या घरी गेली होती. आता अंकिताने या दोघांचं पहिलं केळवण केलं आहे.
-
केळवणाचा व्हिडीओ शेअर करताना सूरजच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हिल करण्यात आला आहे. त्याच्या बायकोचं नाव आहे संजना.
-
सूरजने यावेळी बायकोसाठी एकदम हटके उखाणा घेतला. सूरज म्हणतो, “बिग बॉस’ जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न…संजनाचं नाव घेतो आता करेन लग्न!”
-
सूरजनंतर संजनाने सुद्धा खास उखाणा घेतला. संजना म्हणते, “बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको…सूरज रावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको!”
-
अंकिताने सूरज-संजनाच्या केळवणासाठी खास तयारी केली होती. कोकण हार्टेड गर्लने खास भेटवस्तू देत या दोघांनाही पुढच्या आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सूरजवर सध्या सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
-
आता सूरज-संजना लग्नबंधनात कधी अडकणार हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर व सूरज चव्हाण इन्स्टाग्राम )
Bigg Boss फेम सूरज चव्हाणची होणारी पत्नी आहे तरी कोण? तिचं नाव काय? ‘या’ खास व्यक्तीने केलं पहिलं केळवण, पाहा फोटो…
सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचा पहिला फोटो आला समोर…; ‘गुलीगत किंग’ने घेतला हटके उखाणा, वाचा…
Web Title: Suraj chavan wife first photo her name is sanjana celebrates first kelvan at kokan hearted girl house see photos sva 00