-

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री गिरिजा ओकची सर्वत्र चर्चा रंगली आहे. गिरिजाचा साडीतील सुंदर फोटो सर्वत्र व्हायरल होत असून, आता तिला चाहते ‘न्यू नॅशनल क्रश’ म्हणू लागले आहेत.
-
रातोरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अभिनेत्री गिरिजा ओकने सुद्धा आनंद व्यक्त केला आहे. तसेच सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. आज आपण तिच्या कुटुंबाविषयी माहिती जाणून घेऊयात…
-
गिरिजा ओकने २०११ मध्ये निर्माता सुहृद गोडबोलेशी लग्न केलं. अभिनेत्री प्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक श्रीरंग गोडबोले यांची सून आहे.
-
गिरिजा व सुहृद यांची पहिली भेट २००८ मध्ये आदित्य सरपोतदारच्या साखरपुड्यात झाली होती. त्यावेळी तारे जमीन पर चित्रपटातील अभिनेत्री म्हणून सुहृदला ती माहिती होती.
-
पुढे काही दिवसांनी एका प्रोजेक्टसाठी मानधन, शूटिंगच्या वेळा हे सगळं ठरवण्यासाठी सुहृदने गिरिजाला फोन केला होता. या प्रोजेक्टचं शूटिंग गोव्याला होणार होतं तेव्हा या दोघांची प्रत्यक्षात भेट झाली. त्यानंतर कालांतराने दोघांचेही सूर जुळले.
-
गिरिजा ओक व सुहृद यांना एक मुलगा असून, त्याचं नाव आहे कबीर.
-
गिरिजा सोशल मीडियावर अनेकदा फॅमिली फोटो शेअर करत असते.
-
गिरिजाने २००७ मध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानबरोबर ‘तारे जमीन पर’ सिनेमात काम केलं होतं. यानंतर २०२३ मध्ये ती शाहरुख खानच्या ‘जवान’ सिनेमात झळकली होती.
-
मालिका, चित्रपट, नाटक, ओटीटी अशा चारही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गिरीजाचा साडीतील फोटो अन् तिच्या सुंदर लूकची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. स्लीवलेस ब्लाउज, सुंदर साडी या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. हा फोटो सर्वत्र व्हायरल होऊन चाहते तिला ‘न्यू नॅशनल क्रश’ म्हणू लागलेत.
रातोरात ‘नॅशनल क्रश’ झालेल्या गिरिजा ओकच्या कुटुंबाला पाहिलंत का? ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकांची आहे सून, पाहा पती अन् मुलाबरोबरचे फोटो…
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गिरिजा ओकच्या पतीला पाहिलंत का? पाहा फोटो…
Web Title: Girija oak national crush her love story husband suhrud godbole and her son kabir photos sva 00