-
मसुरी – फिरण्यासाठी छान ठिकाण
ऑगस्टमध्ये १५ ऑगस्ट आणि जन्माष्टमीला सुट्टी असते. या सुट्टीत तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत मसुरीला जाऊ शकता. मसुरी हे उत्तराखंडमधील एक सुंदर आणि प्रसिद्ध डोंगरावरचं ठिकाण आहे. गर्दी जास्त असते, म्हणून तिथे जाण्यापूर्वी तिकीट किंवा हॉटेलचं बुकिंग करून ठेवलं तर बरं. -
मसुरीचं सुंदर वातावरण
थंड वारा, ढगांनी भरलेल्या दऱ्या आणि तिथलं शांत वातावरण कोणालाही आवडतं. पावसाळ्यात तिथं निसर्ग खूप सुंदर दिसतो. मसुरीमध्ये तुम्ही निसर्गाची शांतता आणि थोडं साहस दोन्ही अनुभवू शकता. तिथं अशी खूप छान ठिकाणं आहेत, जी सहल खास बनवतात. -
गन हिल – मसुरीचं उंच ठिकाण
गन हिल हे मसुरीमधील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच ठिकाण आहे. इथून हिमालय आणि मसुरीचा सुंदर नजारा पाहता येतो. तुम्ही इथे रोपवेने किंवा पायी जाऊ शकता. सूर्यास्ताच्या वेळी इथलं दृश्य खूपच सुंदर दिसतं. फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी हे ठिकाण खूप खास आहे. -
केम्प्टी धबधबा – मसुरीजवळील निसर्गरम्य ठिकाण
केम्प्टी धबधबा हा मसुरीपासून सुमारे १५ किमी अंतरावर असलेला एक अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध धबधबा आहे. डोंगरावरून पडणारे थंड पाणी नैसर्गिक स्विमिंग पुलासारखा सुंदर अनुभव देते. पर्यटक येथे फोटोग्राफीसाठी आणि कुटुंबासोबत पिकनिकसाठी येतात. धबधब्याच्या आजूबाजूला अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि छोटी दुकानेही आहेत, त्यामुळे वेळ छान जातो. -
लाल टिब्बा – मसुरीतील सर्वोच्च दृश्यस्थळ
लाल टिब्बा हे मसुरीतील सर्वात उंच ठिकाण आहे, जे लँडोर परिसरात स्थित आहे. येथून तुम्ही केदारनाथ आणि बद्रीनाथच्या बर्फाच्छादित शिखरांचे अप्रतिम दृश्य दुर्बिणीद्वारे अगदी स्पष्टपणे पाहू शकता. येथील शांत, थोडंसं एकांतातलं वातावरण आणि आजूबाजूचा निसर्ग यांचा सुंदर संगम या ठिकाणाला खास आणि मनमोहक बनवतो. निसर्गप्रेमींनी आणि फोटो काढणाऱ्यांनी हे ठिकाण नक्कीच पाहावं! -
मॉल रोड – मसुरीच्या आठवणी जपणारं रंगीबेरंगी ठिकाण
मॉल रोड हा मसुरीतील सर्वात गर्दीचा आणि जिवंत भाग आहे. येथे तुम्हाला कॅफे, खवय्यांसाठी स्टॉल्स, दुकाने, गेमिंग झोन आणि स्थानिक हस्तकलेची दुकाने सहज दिसतील. पर्यटक येथे फिरण्यासाठी, खरेदीसाठी आणि पर्वतीय खाद्यपदार्थांचा आनंद घेण्यासाठी येतात. विशेषतः संध्याकाळच्या वेळेस, जेव्हा थोडीशी थंडी आणि मंद प्रकाश असतो, तेव्हा इथलं वातावरण आणखीच मनमोहक वाटतं. -
कंपनी गार्डन – कुटुंबासाठी शांत आणि रंगीबेरंगी ठिकाण
कंपनी गार्डन हे मसुरीतील एक सुंदर आणि नीटनेटकी बाग आहे, जे कुटुंब आणि मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी योग्य ठिकाण आहे. येथे रंगीबेरंगी फुलांची सजावट, बोटिंगची मजा आणि मुलांसाठी झुल्यांची सोय आहे. इथे तुम्ही पिकनिक, फोटोग्राफी किंवा फक्त शांत बसून निसर्गाचा आनंद घेऊ शकता. देखभालीत असलेली ही बाग एक शांत, स्वच्छ आणि आनंददायक अनुभव देते.
Photos: मसुरी – ट्रिपला जायचंय का? मग ही ठिकाणं चुकवू नका!
Mussoorie Travel Guide : मसुरी हे उत्तराखंड राज्यातील एक प्रसिद्ध डोंगराळ पर्यटनस्थळ आहे, ज्याला “डोंगरांची राणी” म्हणूनही ओळखलं जातं. हे शहर हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं असून, समुद्रसपाटीपासून सुमारे २,००० मीटर उंचीवर आहे.
Web Title: Mussoorie travel guide top places you cant afford to miss ama 06