-
Keto Diet: कीटो डाएटला केटोजेनिक आहार (Ketogenic Diet) असेही म्हणतात. यामध्ये कार्बोहायड्रेट्स (पिष्टमय पदार्थ) खूप कमी खाल्ले जातात. (जसे की भाकरी, भात, बटाटे, साखर, गोड फळे इत्यादी मर्यादित करणे किंवा पूर्णपणे टाळणे)
-
या आहाराचा मुख्य उद्देश शरीराला ‘केटोसिस’ (Ketosis) नावाच्या अवस्थेत आणणे आहे.
-
‘केटोसिस’मध्ये, शरीराला उर्जेसाठी ग्लुकोज (जे कार्बोहायड्रेट्समधून मिळते) मिळत नाही, तेव्हा शरीर साठवलेली चरबी जाळायला सुरुवात करते आणि त्यातून केटोन्स नावाचे ऊर्जा स्रोत तयार करते. हे केटोन्स मग शरीराला आणि मेंदूला ऊर्जा पुरवतात.
-
हा आहार वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो, कारण शरीर ऊर्जेसाठी शरीरातील साठलेली चरबी वापरते.
-
कीटो डाएटमुळे भूक कमी लागते आणि मेटाबॉलिज्म (चयापचय) सुधारते.
-
कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी केल्यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
-
आहारामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट जास्त काळ भरल्यासारखे वाटते आणि सारखी भूक लागत नाही, ज्यामुळे जास्त खाणे टळते.
-
काही लोकांना या आहारामुळे मानसिक एकाग्रता आणि स्पष्टता सुधारल्याचा अनुभव येतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कीटो डाएट सुरू करण्यापूर्वी, विशेषत: जर तुम्हाला आरोग्य समस्या असतील, तर डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा (Dietician) सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे.
Keto Diet Advantages: वजन कमी करण्यासाठी कीटो डाएट आहे खूपच फायदेशीर?
कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी केल्यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
Web Title: Planning for weight loss then you can try keto diet food know its rules advantages sdn