-
चुकीचा समज बहुतेकांना वाटतं की, हृदयविकाराचा झटका म्हणजे छाती दुखते; पण कार्डिओलॉजिस्ट सांगतात की, हा नेहमीच पहिला संकेत नसतो. शरीर आधीच इतर सूक्ष्म लक्षणं दाखवत असतं. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
थकवा हा पहिला इशारा सतत थकवा जाणवणे, विश्रांती घेतल्यावरही न सुटणारा दमल्यासारखा अनुभव हे हृदयाच्या कार्यात बिघाड सुरू असल्याचं लक्षण असू शकतं. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
श्वास घेण्यास त्रास सोप्या कामांदरम्यानही श्वास घ्यायला त्रास होणे किंवा दम लागणं हेही हृदयावर ताण येत असल्याचं चिन्ह मानलं जातं. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
छातीत दडपण किंवा अस्वस्थता छातीत दुखण्याऐवजी हलकं दडपण, चिमटल्यासारखं जाणवणं किंवा जळजळ हेही संभाव्य हृदयविकाराचं प्रारंभिक लक्षण असू शकतं. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
जबडा, खांदे, पाठ किंवा कंबर दुखणे हृदयाशी संबंधित वेदना फक्त छातीतच नाही, तर जबड्यात, पाठीमध्ये किंवा खांद्यांमध्येही जाणवू शकतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
पचनाशी संबंधित त्रास अनेकांना हृदयविकाराच्या आधी अपचन, उलट्या, जळजळ किंवा पोटात दडपण जाणवतं याकडे दुर्लक्ष करू नये. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
लक्षणं हळूहळू वाढतात ही लक्षणं अचानक दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वीपासून किंवा आठवडाभर आधी शरीर या संकेतांच्या माध्यमातून इशारा देत असतं. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
ऊर्जेतील घट डॉ. संजय भोजराज यांच्या मते, ऊर्जेची पातळी कमी होणं हे हृदयाच्या आरोग्याचं महत्त्वाचं सूचक आहे. सतत दमल्यासारखं वाटत असेल, तर त्वरित तपासणी करावी. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
वेळेवर तपासणी महत्त्वाची अशा कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. योग्य वेळी निदान झाल्यास मोठ्या धोक्यापासून बचाव होऊ शकतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
हृदयविकाराचा पहिला संकेत छाती दुखणे नसून ‘हा’ आहे; तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा
कार्डिओलॉजिस्टच्या मते, हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीर काही सूक्ष्म संकेत देतं
Web Title: First sign of heart attack not chest pain fatigue warning cardiologist heart health alert early symptoms svk 05