-
मधुमेह नियंत्रणासाठी मदत – कडीपत्त्यातील जैविक घटक रक्तातील साखर पातळी नियंत्रित करण्यात उपयुक्त ठरतात. नियमित सेवन केल्यास टाईप-२ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये फायदा होऊ शकतो.
-
केस मजबूत आणि काळे ठेवतो – कडीपत्ता केसगळती कमी करतो. त्यामुळे केस मऊ व काळे राहतात. केसांच्या आरोग्यासाठी त्याचा नारळतेलात तडका घेणे प्रभावी उपाय मानला जातो.
-
पचन सुधारतो – कडीपत्ता पचनास मदत करतो. अपचन, गॅस किंवा पोट फुगणे यांसारख्या समस्या तो कमी करतो. पचनासाठी ते एक नैसर्गिक औषध आहे.
-
वजन नियंत्रणात सहायक – त्यातील विशेष घटक चरबी कमी करण्यात मदत करतात. नियमित सेवन केल्यास वजन संतुलित ठेवण्याचा फायदा होतो.
-
रक्तनिर्मितीसाठी उपयुक्त – कडीपत्त्यात लोह आणि फोलेट मुबलक प्रमाणात असतात, जे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यात आणि अॅनिमियावर नियंत्रण ठेवण्यात सहायक ठरतात.
-
डोळ्यांचे आरोग्य टिकवतो – व्हिटॅमिन A व बीटा‑कॅरोटीनमुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि रात्रीच्या अंधत्वापासून संरक्षण मिळते.
-
रोगप्रतिकार शक्ती वाढवतो – कडीपत्त्यात अँटीऑक्सिडंट आणि जीवाणूनाशक गुणधर्म आहेत, जे संसर्गांपासून शरीराचे संरक्षण करतात.
-
मेंदू आणि न्यूरोलॉजिकल आरोग्यासाठी फायदेशीर – कडीपत्त्यातील घटक मेंदूतील तणाव कमी करतात. तसेच न्यूरोलॉजिकल कार्य सुधारतात आणि अल्झायमरसारख्या आजारांपासून संरक्षण देऊ शकतात.
-
हृदयाचे स्वास्थ्य मजबूत करतो – कोलेस्ट्रॉल कमी करतो, रक्तदाब नियंत्रित करतो व हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतो.
-
श्वासोच्छ्वास सुधारतो – कडीपत्ता अँटी‑इन्फ्लॅमेटरी आणि एक्झपेक्टोरंट गुणधर्मांनी घशातील दुखणे, सर्दी, खोकला कमी करण्यात मदत करतो. (सर्व फोटो सौजन्य: अनस्प्लॅश)
‘नैसर्गिक औषध’ असलेल्या कडीपत्त्याच्या पानांचे जाणून घ्या ‘हे’ १० जबरदस्त आरोग्यदायी फायदे
कडीपत्ता फक्त चव वाढवणारा नाही, तर तो आहे शरीरासाठी सुपरफूड; मधुमेहापासून केसांपर्यंत अनेक आजारांवर प्रभावी
Web Title: Curry leaves health benefits natural medicine for digestion hair skin and immunity ayurvedik health tips svk 05