-
भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्यानंतर युट्यूबर अजित भारती यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
-
यूट्यूब व्हिडिओमध्ये अजित भारती यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर उघडपणे शिवीगाळ आणि हल्ला करण्यासाठी लोकांना चिथावणी दिल्याचा, आरोप अनेकांनी केला आहे.
-
बिहारमधील बेगुसराय येथील रहिवासी असलेले अजित भारती स्वतःची ओळख पत्रकार म्हणून करून देतात. त्यांचे एक यूट्यूब चॅनेल आहे. एक्सवर त्यांचे सुमारे ५ लाख फॉलोअर्स आणि ७ लाखांहून अधिक यूट्यूब सबस्क्राइबर्स आहेत. एक्स वर, ते पत्रकार आणि लेखक असल्याचा दावा करतात.
-
अजित भारती यांनी काही काळापूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, त्यावेळी ते चर्चेत आले होते.
-
अजित भारती आणि त्यांच्या पॉडकास्टवरील दोन पाहुण्यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांना शिवीगाळ केली होती. याचबरोबर त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी लोकांना चिथावले, असे त्यांच्या अलीकडील यूट्यूब व्हिडिओंमधील क्लिपवरून दिसून आले आहे. याबाबत मिंटने वृत्त दिले आहे.
-
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी कोर्टरूममध्ये सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही तासांतच अजित भारती यांनी त्यांच्या एक्स आणि इतर सोशल प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला होता.
-
भारताचे अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांना पत्र लिहून सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याची चिथावणी दिल्याचा आरोप करत, मिशन आंबेडकर संघटनेच्या संस्थापकांनी कथाकार अनिरुद्धाचार्य आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अजित भारती यांच्याविरुद्ध फौजदारी अवमान कारवाई सुरू करण्याची परवानगी मागितली आहे.
-
कायद्यानुसार एखाद्या खाजगी व्यक्तीविरुद्ध न्यायालयाचा अवमान करण्याची कारवाई सुरू करण्यासाठी अॅटर्नी जनरल यांची संमती आवश्यक असते.
-
नोएडा पोलिसांनी मंगळवारी अजित भारती यांची चौकशी केली. पण, अजित भारती यांनी फक्त एवढेच सांगितले की, त्यांना त्यांच्या अलीकडील सोशल मीडिया पोस्टच्या संदर्भात समन्स बजावण्यात आले आहे. (All Photos: @ajeetbharti/X)
CJI B. R. Gavai यांच्यावर हल्ला करण्याची चिथावणी दिल्याचा आरोप; कोण आहेत अजित भारती?
Who Is Ajeet Bharti: अजित भारती यांनी काही काळापूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, त्यावेळी ते चर्चेत आले होते.
Web Title: Cji b r gavai attack controversy provocative statements who is ajit bharti social media posts viral video aam