-
देशात करोनाचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. दुसरीकडे आर्थिक संकट मोठं होताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं अर्थगाड्यासह जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेन पावलं टाकली आहेत. यासाठी अनलॉक कार्यक्रम जाहीर केला असून, आतापर्यंत अनलॉकचे तीन टप्पे पार पडले आहेत. (संग्रहित छायाचित्र)
-
अनलॉक ३ चा टप्पा ३१ ऑगस्ट रोजी संपल्यानंतर केंद्र सरकारनं अनलॉक ४ साठीची नियमावली जाहीर केली होती. अनलॉक ४मध्ये अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवण्यात आले. त्यामुळे जनजीवन बऱ्यापैकी सुरळीत होण्यास काही प्रमाणात मदत झाली आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
विशेष म्हणजे अनलॉक ४ जाहीर करताना केंद्र सरकारनं राज्यांना महत्त्वाची सूचना केली होती. कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी स्थानिक पातळीवर लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय केंद्राशी चर्चा केल्याशिवाय घेऊ नये, असं केंद्रानं सांगितलं होतं. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
अनलॉक ४ जाहीर करताना केंद्रानं सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील सार्वजनिक कार्यक्रमांना २१ सप्टेंबरपासून मुभा दिली होती. त्यामुळे आजपासून नियमावलीचं पालन करून हे समारंभ आयोजित करता येणार आहेत.
-
संग्रहित छायाचित्र
-
३० सप्टेंबपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंदच राहणार असली तरी ९वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या लेखी परवानगीने शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत जाण्याची मुभा दिली जाऊ शकते. त्यामुळे काही शैक्षणिक घडामोडी २१ सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. (संग्रहित छायाचित्र)
-
कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ वा राज्य कौशल्य विकास योजनेअंतर्गत होणारे प्रशिक्षण वर्ग या संस्थाही पुन्हा सुरू होणार आहेत. (फोटो -पीटीआय)
-
प्रयोगशाळांची गरज असलेले तांत्रिक आणि व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि संशोधन (पीएचडी) संस्थांनाही मुभा देण्यात येईल. या शैक्षणिक घडामोडी सुरू करण्यासाठी स्वतंत्र आरोग्य सूचना प्रसिद्ध केल्या जातील. (संग्रहित छायाचित्र)
-
विद्यार्थ्यांना स्वेच्छेने शाळा-महाविद्यालयांमध्ये जाण्याची २१ सप्टेंबरपासून परवानगी असेल. ५० टक्के शिक्षक आणि कर्मचारी वर्गाला शाळा-महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहता येईल. ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकवला जाईल, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले. (संग्रहित छायाचित्र)
-
नियंत्रित विभागांच्या बाहेर राज्यांना केंद्राशी चर्चा न करता परस्पर स्थानिक पातळीवर टाळेबंदी लागू करता येणार नाही. अनेक राज्यांमध्ये स्थानिक प्रशासन दोन-पाच दिवसांची तात्पुरती टाळेबंदी लागू करत आहे. या अनियमित टाळेबंदीला केंद्राने मनाई केली आहे. राज्याअंतर्गत आणि आंतरराज्यीय वाहतुकीस ई-पासची गरज नाही. वस्तूंची वाहतूक आणि व्यक्तींना विनाअडथळा प्रवास करता येऊ शकेल, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
अनलॉक ४ : १ सप्टेंबरनंतर लॉकडाउनमध्ये होतील ‘हे’ बदल
विद्यार्थ्यांना असेल शाळा, महाविद्यालयात जाण्याची मूभा
Web Title: Unlock 4 0 guidelines here is whats allowed whats not bmh