नदीपात्रात तरुणावर शस्त्राने वार करुन खून केल्या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खून प्रकरणातील पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.हर्षल वेळापुरे, मंदार वनकुद्रे, समीर हेंगळे, सूरज पिंगळे, निखील सातपुते, सुनील गायकवाड, सागर माने, अमर शिवले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गणेश सुरेश कदम (वय ३६, रा. अमृतेश्वर मंदिराजवळ, शनिवार पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. कदमचे वडील सुरेश दत्तात्रय कदम (वय ६१) यांनी याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश कदम रविवारी (२५ सप्टेंबर) सायंकाळी घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतला नाही. सोमवारी (२६ सप्टेंबर) तो भिडे पुलाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत मृतावस्थेत सापडला. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याचे उघडकीस आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : दहीहंडी उत्सवात गोळीबार ; गुंड टोळीवर मोक्का कारवाई

गणेश याचा खून संशयित आरोपींनी केल्याची फिर्याद त्याचे वडील सुरेश कदम यांनी दिली. त्यानंतर या प्रकरणात आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेशचा भाऊ ओम याचा खून सात वर्षांपूर्वी नवरात्रोत्सवात करण्यात आला होता. त्या वेळी ओम कदम खून प्रकरणात संशयित आरोपी हर्षल वेळापुरे याच्यासह साथीदारांच्या गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती.. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेणात येत असून सहायक पोलीस निरीक्षक चोरमले तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against eight people in the case of killing a youth by stabbing him with a weapon in nadipatra pune print news amy