पुणे : राज्यातील सहा जिल्ह्यांत सोमवारी (२७ मे) उष्णतेची लाट किंवा उष्णतेची लाट सदृश स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेची तीव्रता जास्त राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर गुजरात आणि मध्य प्रदेशात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भात तापमान वाढ होऊन उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. सोमवारी प्रामुख्याने नांदेड, हिंगोली, धुळे, जळगावात आणि चंद्रपूर येथे पुढील तीन दिवस तर, अकोल्यात चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. राज्याच्या किनारपट्टीवर पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in