पुणे: फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पब मधील बाथरूममध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आज पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पबवर दगडफेक करत तोडफोड केली. पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पब मधील बाथरूममध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, राज्यातील विरोधी पक्षातील नेते मंडळी आक्रमक झाले असून त्या प्रकरणी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक (गुन्हे) अनिल माने, सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील आणि दोन बीट मार्शल यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी काढले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video: पिंपरी- चिंचवडमध्ये रिल्स बनवत वाहनांची तोडफोड; दोन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

तर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पुणे पोलिसांनी एल ३ लिक्विड लिजर लाऊज हे पब सील करत या प्रकरणी रवी माहेश्वरी, उत्कर्ष देशमाने, योगेंद्र गिरासे, मानस मलिक, अक्षय कामठे यांसह अन्य तिघांना असे एकूण आठ जणांना अटक केली आहे. तसेच या पार्टीत सहभागी झालेल्या तरुणांची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

या सर्व घडामोडी दरम्यान पतित पावन संघटनेच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पबवर दगडफेक करीत तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune patit pavan sanghatana stone pelting on pub at ferguson road where young boys consumed drugs svk 88 css