पुणे : गौरी आगमनानिमित्त सर्व प्रकारच्या भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भाज्यांसह अंबाडी, आळूची पाने, शेपू, मेथी, कोथिंबीरचे दर तेजीत आहेत. गौरीचे आगमन मंगळवारी झाले. घरोघरी विधीवत पूजन करण्यात आले. बुधवारी गौरी पूजन असून, भाज्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. महात्मा फुले मंडई, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड परिसरात सकाळपासून खरेदीसाठी गर्दी झाली होती. गौरीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी लागणाऱ्या अंबाडी, आळूची पाने, शेपू, मेथी या पालेभाज्यांच्या मागणीत वाढ झाली. नैवेद्यासाठी लागणाऱ्या पालेभाज्यांच्या जुडीचे दर ४० ते ६० रुपयांपर्यंत आहेत. आळूच्या पानांचे दर २० ते २५ रुपये आहेत. कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर ७० ते ८० रुपयांपर्यंत आहेत. पडवळचे किलोचे दर १०० ते १२० रुपये आहेत. गौरी आगमनानिमित्त भाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, बहुतांश भाज्यांचे किलोचे दर शंभर रुपयांच्या पुढे आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाज्यांचे दर तेजीत असल्याची माहिती किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे भाज्या, पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. भाज्यांच्या प्रतवारीवरही परिणाम झाला. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या भाज्यांचे दर तेजीत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Hinjewadi IT Park : जबाबदारीची अशी ही ढकलाढकली! वाहतूक कोंडीबाबत चार सरकारी यंत्रणांचे एकमेकांकडे बोट

लसूण, मटार महाग

परराज्यातून होणारी लसणाची आवक कमी झाली आहे. लसणाचा हंगाम संपला असून, किरकोळ बाजारात एक किलो लसणाचे दर प्रतवारीनुसार ४५० ते ५०० रुपये आहेत. पुरंदर, वाई, सातारा, पारनेर भागातील मटारचे पावसामुळे नुकसान झाले. त्यामुळे परराज्यातून मटार मागविण्यात आला आहे. मटारचे किलोचे दर ३०० ते ३५० रुपये आहेत. कांद्याचे दर तेजीत असून एक किलो कांद्याचे दर ६० ते ७० रुपयांपर्यंत आहेत.

पावसामुळे बहुतांश फळभाज्या आणि पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे भाज्या खराब झाल्या आहेत. चांगल्या प्रतीच्या भाज्यांचे दर तेजीत आहे. नवीन लागवड केलेल्या भाज्यांची आवक होण्यास किमान १५ ते २० दिवस लागणार आहेत. त्यानंतर भाज्यांचे दर कमी होतील.

प्रकाश ढमढेरे, भाजीपाला विक्रेते

हेही वाचा : मुख्यमंत्रिपदाच्या ‘बिहार पॅटर्न’ची अफवा; अजित पवार यांचे स्पष्टीकरण

भाज्यांचे किलोचे दर

मटार – ३०० ते ३५० रुपये

बटाटा- ४५ ते ५० रुपये

कांदा – ६० ते ७० रुपये

फ्लाॅवर – १२० ते १४० रुपये

कोबी – ७० ते ८० रुपये

दोडका – १२० ते १४० रुपये

लसूण – ४५० ते ५०० रुपये

पडवळ -१०० ते १२० रुपये

कोथिंबीर – ७० ते ८० रुपये जुडी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune vegetable prices increased due to gauri pujan pune print news rbk 25 css