पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन काल शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी माजी नगरसेवक यांच्यासह आजी माजी ३० पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्या घटनेला काही तास होत नाही. तोवर आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड येथील आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी यांच्या समवेत बैठकीला सुरुवात झाली आहे. हेही वाचा. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकी बाबत काय चर्चा होते. याबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवार गटात जाणार होते. मात्र त्यांनी शरद पवार गटात न जाता अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे आजच्या बैठकीला उपस्थितीवरुन स्पष्ट होत आहे.