पुण्यातील विमानगर भागात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रय व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून देहविक्रय करणाऱ्या तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी मसाज सेंटरचा व्यवस्थापक इमदादुला इस्माईल अली (वय १९) याला अटक करण्यात आली आहे. मसाज सेंटरचा मालक शंतनू सरकार, शमशुद्दीन, जयराम वॅलपुली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमाननगरमधील गल्ली क्रमांक तीन मध्ये एका बंगल्यात अमेया स्पा नावाने मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्रय सुरू असल्याची गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांना मिळाली पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून शहानिशा केली. त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला.

मसाज सेंटरमधील व्यवस्थापक इमदादुला अलीला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून नऊ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. आरोपीं विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, मोहिते, अश्विनी केकाण, हनुमंत कांबळे, आण्णा माने आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police raid massage centre running prostitution pune print news sgy