After the announcement of the 5G service, Mukesh Ambani said, "Jio 5G plans | Loksatta

5G Launch In India: Jio कितीमध्ये देणार सेवा, मुकेश अंबानी म्हणाले…

भारतात इंटरनेट युजर्सची 5G ची प्रतीक्षा आता संपली असून 5G सेवेचा शुभारंभ झाला आहे. रिलायन्स जिओचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी Jio 5G च्या किंमती संबंधित माहिती दिली आहे. जाणून घेऊया काय म्हणाले मुकेश अंबानी.

5G Launch In India: Jio कितीमध्ये देणार सेवा, मुकेश अंबानी म्हणाले…
Photo-File Photo

भारतात इंटरनेट युजर्सची 5G ची प्रतीक्षा आता संपली असून आज १ ऑक्टोबर २०२२ रोजी पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडियन मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5G सेवेचा शुभारंभ केला आहे. वापरकर्ते दिवाळीपासून 5G सेवा वापरू शकतील. या कार्यक्रमात रिलायन्स जिओचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी Jio 5G च्या किंमती संबंधित माहिती दिली आहे. जाणून घेऊया काय म्हणाले मुकेश अंबानी.

डिसेंबर २०२३ पर्यंत Jio चे 5G नेटवर्क भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल

या कार्यक्रमादरम्यान, रिलायन्स जिओचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी Jio 5G च्या किंमती आणि लॉन्चशी संबंधित बरीच माहिती दिली. ते म्हणाले की, कंपनीचा दावा आहे की, डिसेंबर २०२३ पर्यंत Jio चे 5G नेटवर्क भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.

5G सेवा प्रथम मेट्रो शहरांमध्ये सोडली जाईल आणि 4G पेक्षा दहापट अधिक गती मिळेल. सर्वप्रथम ही सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे सुरू केली जाईल.

आणखी वाचा : आजपासून 5G सेवेचा शुभारंभ! महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांसह १३ शहरांत मिळणार 5G चं सुपरफास्ट नेटवर्क; पाहा यादी

माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, येत्या दोन वर्षात सरकारचे लक्ष्य आहे की, संपूर्ण देशात 5G सेवेची सुविधा पोहोचवली जाणार आहे. यासाठी जवळपास तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. डिजिटल कनेक्टिविटी, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया और मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारचे हे धोरण आहे. वर्ष २०१४ मध्ये १० कोटी ग्राहकांच्या तुलनेत आज ८० कोटी ग्राहकांकडे ब्रॉडबँड कनेक्शन आहे. 5G तंत्रज्ञान 4G सेवेची गती जवळपास १० पटीने अधिक आहे.

काय आहे 5G नेटवर्क?

सध्या बाजारात 2G ते 4G पर्यंत सिमकार्ड उपलब्ध आहेत. 4G वरून 5G सेवा अपग्रेड केल्यानंतर ग्राहकांना सिमकार्ड बदलावे लागणार नाही. ग्राहकांना त्यांच्या टेलिकॉम ऑपरेटरला कळवून 4G कनेक्शन थेट 5G मध्ये रूपांतरीत करता येईल. तसेच तुम्हाला 5G सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 5G मोबाईल असणे सुद्धा गरजेचे आहे. 4G स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5G सेवा सुरू करता येणार नाही.

Jio 5G प्लॅन खूप स्वस्त होणार!

मुकेश अंबानी यांनी सादर तपशील तसेच किंमतीबद्दल खुलासा केला आहे. याची नेमकी किंमत सांगितली गेली नाही, मात्र Jio 5G चे प्लॅन महाग नसतील असे नक्कीच सांगण्यात आले आहे. असे सांगण्यात आले आहे की चांगल्या गतीने चालणाऱ्या या 5G नेटवर्कचे प्लॅन किफायतशीर असतील आणि इतके स्वस्त असतील की इतर कोणीही ऑफर केले नसते.

 

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गुगल करणार ‘ही’ लोकप्रिय सेवा बंद ; जाणून घ्या कारण…

संबंधित बातम्या

Bluebugging: ब्लूटूथ सुरू ठेवणे पडू शकते महागात, डेटा होऊ शकतो चोरी
मस्तच! आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये स्वत:लाच पाठवता येईल मेसेज, तयार करता येईल नोट्स, ‘असे’ वापरा नवीन फीचर
X-Ray ची सुरुवात कशी झाली माहित आहे का? जाणून घ्या सर्वप्रथम शरीराच्या कोणत्या भागाचा एक्स-रे काढण्यात आला
Google Maps चालणार इंटरनेटशिवाय; जाणून घ्या, नकाशे ऑफलाइन डाउनलोड करण्याची सोपी पद्धत
व्हा सावधान! 5G अपग्रेड सारखं तुम्ही ही राहा अपडेट; नाहीतर बँक खाते रिकामे झाल्याचा येईल मेसेज…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Akshaya Hardeek Wedding : ‘हळद लागली, हळद लागली…’ नवरदेव बसला पाटावर, हार्दिक जोशीच्या हळदी कार्यक्रमाची खास झलक
“Greatest Off All Time म्हणजेच GOAT”, बकऱ्यावर चढला फुटबॉल फिव्हर, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, ‘भावा याला तर FIFA ला पाठवा’
FICA: धक्कादायक! पैसा की देश, फिकाच्या रिपोर्टने क्रिकेटविश्वात उडवली खळबळ
“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान!
“मी टीकेचा धनी…” सिद्धार्थ जाधवने केले सिनेसृष्टीतील ट्रोलिंगवर भाष्य