ठाण्यात ३ ते ६ फेब्रुवारीपर्यंत ‘क्रेडाई एमसीएचआय’च्या वतीने प्राॅपर्टी मेळाव्याचे आयोजन | Organized property fair on behalf of CREDAI MCHI in Thane amy 95 | Loksatta

ठाण्यात ३ ते ६ फेब्रुवारीपर्यंत ‘क्रेडाई एमसीएचआय’च्या वतीने प्राॅपर्टी मेळाव्याचे आयोजन

ठाण्यात ‘क्रेडाई एमसीएचआय’च्या वतीने ३ ते ६ फेब्रुवारीपर्यंत ‘प्राॅपर्टी २०२३ ठाणे’ या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

credai mchi
ठाण्यात ३ ते ६ फेब्रुवारीपर्यंत ‘क्रेडाई एमसीएचआय’च्या वतीने प्राॅपर्टी मेळाव्याचे आयोजन (संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

ठाण्यात ‘क्रेडाई एमसीएचआय’च्या वतीने ३ ते ६ फेब्रुवारीपर्यंत ‘प्राॅपर्टी २०२३ ठाणे’ या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हा मेळावा पोखरण रोड क्रमांक १ येथील रेमंड मैदानात होणार असून त्याचे उद्घाटन मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली.

हेही वाचा >>>काटई बदलापूर मार्गावरील जीवघेणे खड्डे बुजवा ,प्रवासी संतप्त; अचानक येणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत

ठाणे शहरात गेल्याकाही वर्षांपासून मोठे बांधकाम प्रकल्प उभे राहिले आहेत. त्याची माहिती क्रेडाई एमसीएचआयच्या वतीने ठाण्यात देण्यात आली. नागरिकांना स्वप्नातली घरे किफायतशीर किमतीत मिळावी यासाठी क्रेडाई एससीएचआयच्या वतीने ३ ते ६ फेब्रुवारी या दिवसांत रेमंड मैदानात प्राॅपर्टी २०२३ ठाणे मेळावा घेण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० वाजतापर्यंत हा मेळावा सर्वांसाठी विनामुल्य पाहता येणार आहे. हा २० वा प्राॅपर्टी मेळावा असल्याचे क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितले. तर, हे प्रदर्शन आपल्या स्वप्नातील घरांची परिपूर्ती करणारे असेल अशा विश्वास संस्थेचे सचिव मनिष खंडेलवाल यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 16:46 IST
Next Story
काटई बदलापूर मार्गावरील जीवघेणे खड्डे बुजवा ,प्रवासी संतप्त; अचानक येणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत