ठाणे : ठाणे महापालिकेचा तयार करण्यात आलेला विकासआराखडा बांधकाम व्यवसायिक धार्जिणा आहे. हा आराखडा तयार करताना तो बांधकाम व्यावसायिकांच्या मनासारखा तयार व्हावा, याकरिता प्रति चौ. फुटा मागे ३०० रुपये दर घेतला गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन काही लोकांनी करोडो रुपये वसूल केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना मात्र याबाबत काहीच माहीत नाही असा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिकेने विकास आराखडा तयार केला आहे. या विकास आराखड्यावर सोमवारी जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेतून टीका केली. हा विकास आराखडा म्हणजे पूर्ण खारीगाव उद्धवस्त करणारा आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात जाऊन याबाबतचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. हा संपूर्ण आराखडा बांधकाम व्यावसायिक धार्जिणा असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

हेही वाचा – ठाण्यात बंडखोरीला काँग्रेस शहराध्यक्षांचे बळ?

हेही वाचा – माझ्याच विकासकामांतून सुभाष पवार कंत्राटदार झाले, आमदार किसन कथोरेंचा सुभाष पवारांवर हल्लाबोल

मुंब्रा शहरात ज्या ठिकाणी आम्ही मैदान मागत होतो. त्या सहा एकरच्या जागेवर स्म्शानभूमीचे आरक्षण टाकण्यात आले. याकरिता सहाव्या मजल्यावर ज्या व्यक्तीची मक्तेदारी चालते त्याने हा सर्व प्रकार केला आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. विकास आराखडा ठाण्यातील दोन ते तीन बांधकाम व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आलेला आहे. हा आराखडा तयार करताना तो बांधकाम व्यावसायिकांच्या मनासारखा तयार व्हावा, याकरिता प्रति चौ. फुटामागे ३०० रुपये दर घेतला गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन काही लोकांनी करोडो रुपये वसूल केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना मात्र याबाबत काहीच माहीत नाही, मुख्यमंत्री निष्कारण बदनाम होत आहेत असेही आव्हाड म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recovery of crores in the name of cm eknath shinde in thane serious accusation of mla jitendra awhad ssb