एमआयडीसी कार्यालयात प्रदुषण नियंत्रण मंडळाला मिळणार जागा ; लोकप्रतिनिधींच्या मागणीला उद्योगमंत्र्यांची संमती |The Pollution Control Board space MIDC office minister uday samant order ambarnath | Loksatta

एमआयडीसी कार्यालयात प्रदुषण नियंत्रण मंडळाला मिळणार जागा ; लोकप्रतिनिधींच्या मागणीला उद्योगमंत्र्यांची संमती

डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरात औद्योगिक वसाहती आहेत. अनेक कंपन्या येथे असून त्यात रासायनिक कंपन्यांचाही समावेश आहे.

एमआयडीसी कार्यालयात प्रदुषण नियंत्रण मंडळाला मिळणार जागा ; लोकप्रतिनिधींच्या मागणीला उद्योगमंत्र्यांची संमती
उदय सामंत (संग्रहित छायाचित्र)

अंबरनाथ : डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये असलेल्या उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रामुळे अनेकदा प्रदुषणाच्या तक्रारी समोर येत असतात. मात्र या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी कल्याण येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयातून अधिकारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत प्रदुषणाची तीव्रता कमी झालेली असते. त्यावर तोडगा म्हणून आता एमआयडीसी कार्यालयातच प्रदुषण नियंत्रण मंडळांना जागा देण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.

डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरात औद्योगिक वसाहती आहेत. अनेक कंपन्या येथे असून त्यात रासायनिक कंपन्यांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षात या औद्योगिक क्षेत्रांमधील प्रदुषणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कंपन्यांमधून रासायनिक वायू सोडणे, प्रक्रिया न केलेले सांडपाणी, रसायने थेट जलस्त्रोतात सोडणे असे प्रकार केले जातात. त्यामुळे नाले, जलस्त्रोत किंवा कंपन्यापासून जवळ असलेल्या नागरी वस्त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत अनेकदा रासायनिक सांडपाणी सोडल्याचे समोर आले आहे. तर अंबरनाथमध्ये मोरिवली औद्योगिक क्षेत्रातून अनेकदा वायू गळतीच्या तक्रारी येत असतात. या औद्योगिक क्षेत्राशेजारी असणाऱ्या रहिवासी संकुलांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. बदलापूर शहरातही तीच परिस्थिती असून येथील खरवई, शिरगाव या भागातील नागरिकांना कंपन्यातून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक वायूचा त्रास होतो.

हेही वाचा : विवाहाच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बळकाविली मृताची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ; महिला अटकेत

याबाबत अनेकदा तक्रारी केल्या जातात. नागरिकांच्या संघटना, लोकप्रतिनिधी प्रदुषणाच्या तक्रारी कल्याणच्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाला करत असतात. मात्र या कार्यालयातून घटनास्थळी येण्यासाठी अधिकाऱ्यांना अर्धा ते एक तासापेक्षा अधिक कालावधी लागतो. अनेकदा नाल्यात सोडलेले सांडपाणी किंवा वायुगळतीची तीव्रता तोपर्यंत कमी होते. परिणामी प्रदुषणाचे ठोस पुरावे हाती लागत नाही. अनेकदा कंपन्यांचे यामुळे फावते. त्यामुळे या तक्रारींना तात्काळ तपासण्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसीच्या कार्यालयातच जागा देण्याची सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली. उद्योग मंत्री उदय सामंत यांंच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीत हा विषय चर्चेला आला. उद्योग मंत्र्यांनी तात्काळ एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना अशा जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे येत्या काळात एमआयडीसी कार्यालयातच प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दिसू शकतात.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बनावट परवानग्यांद्वारे ‘रेरा’ प्रमाणपत्र मिळविल्याबद्दल डोंबिवलीतील ३८ भूमाफियांवर फौजदारी गुन्हे दाखल

संबंधित बातम्या

श्वानावर उपचार करण्यास सांगितल्याने दोघांना मारहाण
ठाण्यात शिवसेना vs ‘शिंदे सेना’: ‘आम्ही शिंदे समर्थक’ बॅनरबाजी! बॅनर्सवरुन उद्धव ठाकरेंचा फोटो गायब; बाळासाहेब, आनंद दिघेंना स्थान
कल्याण : कडोंमपात कंत्राट मिळविण्यासाठी सनदी लेखापालाचे बनावट पत्र सादर गुन्हा दाखल
विश्लेषण : नवी मुंबई, ठाण्यापाठोपाठ डोंबिवलीतही? सॅटीस प्रकल्प का ठरतेय गरज आणि अडचणही?
पोलिसांनी जप्त केलेल्या सदनिकांची विक्री; ठाणे महापालिकेच्या तत्कालीन साहाय्यक आयुक्तासह पाचजणांविरोधात गुन्हा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
fifa world cup 2022 : नेदरलँड्स, सेनेगलची आगेकूच
भारतीय संघाचे मालिका बरोबरीचे लक्ष्य!; न्यूझीलंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी
‘काश्मीर फाइल्स’ प्रकरणी इस्रायलचा माफीनामा; लापिड यांनी केलेली टीका वैयक्तिक : राजदूत
गोवरचा फैलाव करोनापेक्षा पाचपट वेगाने!; लस उपलब्ध असल्यामुळे धोका मात्र कमी