Viral Video : राज्याची राजधानी आणि देशातील आर्थिक शहर म्हणून ओळखली जाणारी मुंबई अनेकांची प्रिय आहे. दरदिवशी लाखो लोक मुंबईत येतात. अनेक जण शिक्षणासाठी, नोकरीसाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येथे येतात. मुंबई सर्वांना आपली हक्काची वाटते. सोशल मीडियावर मुंबई शहराचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मुंबई लोकलचे व्हिडीओ सर्वाधिक चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ऑटो रिक्षा चालकाचा आहे.या व्हिडीओत हा ऑटो रिक्षा चालक चक्क चालत्या रिक्षात गाणं गाताना दिसतोय. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हायरल व्हिडीओ संगीतकार अमित त्रिवेदी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक ऑटो रिक्षा चालक चालत्या रिक्षामध्ये गाणं गाताना दिसत आहे. रिक्षाला कॉन्सर्टचा लूक दिला असून रंग बेरंगी लाईट्सनी या रिक्षा सजलेला दिसत आहे. रिक्षाच्या मागच्या बाजूला ‘विश यू हॅप्पी बर्थडे’ सह अनेक नावे लिहिली आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चालकाच्या हातात माइक आहे आणि माइकवर हा रिक्षा चालक मोहम्मद रफी यांचे लोकप्रिय गीत “खोया खोया चाँद खुला आसमान” गाताना दिसत आहे.

हेही वाचा : “चले ही जाना है, नजर चुरा के यूँ..” गाण्यावर तरुणीने केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून आठवेल कॉलेजचे दिवस

या व्हिडीओला शेअर करताना अमित त्रिवेदी कॅप्शनमध्ये लिहितात, “मुंबईच्या रस्त्यावर एका खऱ्या आवडीचे दर्शन झाले. एका रिक्षा चालकाने रिक्षाला पूर्णपणे कॉन्सर्टचा स्टेज बनवला होता आणि हे पाहून मला खूप आनंद झाला.हा क्षण पाहून मला जाणवले की आपल्या देशात टॅलेंटची कमतरता नाही. मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली असती तर.. पण असो, त्यांना पाहून माझा दिवस चांगला गेला. मला आशा आहे की तुमचा सुद्धा दिवस चांगला जाईल.” हा व्हिडीओ मुंबईच्या बांद्रा परिसरातील असल्याचे अमित त्रिवेदी यांनी कॅप्शनमध्ये सांगितले.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप टॅलेंटेड आहे पण ड्रायव्हिंग करताना काळजी घ्यावी. तर एका युजरने लिहिलेय, “त्यांना वायरलेस माइक गिफ्ट द्यायला पाहिजे” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे असं करुन ही व्यक्ती आनंद आणि सकारात्मकता सगळीकडे पसरवत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A driver sing a bollywood song in moving auto rickshaw mumbai video goes viral ndj