Viral Video : शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचे एक वेगळे स्थान आहे. शाळेच्या आठवणी कायम मनात जीवंत असतात. शाळेचे मित्र, शाळेचे शिक्षक कायम मनात घर करून राहतात. सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा शाळेच्या आठवणी ताज्या होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक विद्यार्थी त्याच्या शिक्षकाला त्यांचे स्केच भेट म्हणून देताना दिसत आहे. हे स्केच पाहून शिक्षक भारावून जातात आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलते. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना शाळेतील त्यांचे आवडते शिक्षक आठवू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ एक शाळेतल्या वर्गखोलीतील आहे. वर्गात शिक्षक शिकवत असतात आणि विद्यार्थी बाकेवर बसलेले दिसतात. अचानक शिक्षक एका विद्यार्थ्याजवळ येतात तेव्हा अचानक विद्यार्थी बॅगमधून एक फोटो काढतो आणि उलटा फोटो त्यांच्या हातात देतो. जेव्हा शिक्षक फोटो पालटून पाहतात तेव्हा त्यांना त्यांचा सुंदर स्केच त्यावर काढलेला दिसतो. हे पाहून त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव क्षणात बदलतात आणि रागीट चेहऱ्यावर आनंद उमलतो. त्यांचा आनंद गगनात मावेनासा असतो. शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून विद्यार्थ्याला सुद्धा खूप आनंद होतो. शेवटी शिक्षक स्केच काढलेला फोटो वर्गातील इतर विद्यार्थ्यांना दाखवतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
या विद्यार्थ्याने हुबेहूब शिक्षकांचे अप्रतिम असे स्केच काढले आहे. हा विद्यार्थी स्केच काढण्यात पारंगत असावा. असं म्हणतात की कलेने माणसं जिंकता येतात. याचे हे उत्तम उदाहरण आहे.

हेही वाचा : चहामध्ये मीठ? चहाच्या रेसिपीवरून अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पेटला वाद; वाचा, नेमके प्रकरण काय?

l_e_sims या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “शिक्षकांच्या चेहऱ्यावरील भाव कसा बदलला” तर एका युजरने लिहिलेय, “शाळेतील शिक्षकांची कुठेच तोड नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून मला माझ्या आवडत्या शिक्षकाची आठवण आली” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A student draw sketch of his teacher by watching himself sketch in a frame teachers happiness has no bound video goes viral on social media ndj
First published on: 27-01-2024 at 18:45 IST