Tea Controversy : चहा हा भारतीयांसाठी खास जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतात कोणत्याही ऋतूमध्ये दिवसाची सुरुवात चहाच्या सेवनाने होते. अनेकांना चहा इतका प्रिय आहे की, दिवसातून दोन-तीन वेळा ते न चुकता चहा पितात. आपल्या देशात चहाच्या अनेक रेसिपी आहेत. प्रत्येक रेसिपी ही चहाला एक वेगळी चव देते. जर तुम्हाला विचारले की, एका चांगल्या चहामागील रहस्य काय, तर तुम्ही काय सांगाल? अमेरिकेच्या एका शास्त्रज्ञाने चिमूटभर मीठ हे एका चांगल्या चवीच्या चहामागील रहस्य सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने ब्रिटन देश मात्र चांगलाच संतापला. “चहा कसा बनवायचा, हे आम्हाला शिकवू नका”, असे म्हणत सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटला आहे.
चहाची ही अनोखी रेसिपी कोणी सांगितली होती?
ब्रायन मॉर कॉलेजमधील रसायनशास्त्र शिकवणारे प्राध्यापक मिशेल फ्रँकल यांनी चहामध्ये मीठ टाकण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या मते, चहामध्ये चिमूटभर मीठ टाकल्याने चहाचा कडूपणा दूर होतो. पण, फ्रँकल यांचा हा सल्ला ब्रिटनच्या लोकांना आवडला नाही. त्याचे पडसाद ब्रिटिश मीडियाच्या विविध लेखांमध्ये आणि सोशल मीडियावर दिसून आले.
हेही वाचा : राजसी सौंदर्य! काझीरंगामध्ये घडले दुर्मीळ सोनेरी वाघाचे दर्शन; मुख्यमंत्र्यांनी शेअर केला PHOTO, म्हणाले..
अमेरिकेचे राजदूत यांनी जारी केलेली नोटीस व्हायरल
शेवटी अमेरिकेचे राजदूत यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करीत एक नोटीस जारी केली. त्यांनी त्यात लिहिले, “या रेसिपीमुळे ब्रिटनबरोबर असलेल्या आमच्या खास नात्यावर गरम पाणी टाकले गेले आहे. त्यामुळे हा या रेसिपीद्वारे केलेला दावा चिमूटभर मिठाप्रमाणे गृहीत धरावा. चहा हे आपल्या देशाला एकत्रित आणणारे एक अमृत आहे. जर अशा प्रकारच्या अवमानजनक प्रस्तावामुळे आपल्यातील चांगले संबंध खराब होत असतील, तर आम्ही शांत बसू शकत नाही. ब्रिटनच्या राष्ट्रीय पेयामध्ये मिठाचा समावेश करण्याचे आमचे अधिकृत धोरण नाही आणि भविष्यात कधी नसेल. आपण खंबीरपणे एकत्र येऊ या आणि जगाला दाखवू या की, जेव्हा चहावर प्रश्न येतो तेव्हा आम्ही एकत्र उभे राहू.”
या नोटीसमध्ये शेवटी लिहिलेय, “अमेरिकन दूतावास नेहमीप्रमाणेच चहा मायक्रोवेव्हमध्ये बनवत राहील.” त्यांच्या या विधानाने आणखी नवा वाद निर्माण होऊ शकतो.
अमेरिकेचे चहाशी अनोखे नाते
चहाशी संबंधित अमेरिका आणि ब्रिटनचे जुने नाते आहे. १९७३ मध्ये बोस्टन येथे ब्रिटिश कराविरोधात काही आंदोलन करणाऱ्या लोकांनी ३०० पेक्षा जास्त चहाच्या पेट्या समुद्रात फेकल्या होत्या. ही घटना अमेरिकन क्रांतीला प्रोत्साहन देणारी एक ठिणगी मानली जाते.