Viral video: सोशल मीडियाचे जग मजेदार फोटो आणि प्राण्यांच्या व्हिडीओंनी भरलेले आहे. ज्या लोकांना प्राण्यांची खूप आवड आहे, ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर बघण्यात घालवतात. असे लोक पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य मानतात आणि त्यांना सांभाळतात. तर असेही काही लोक आहेत, जे या मुक्या प्राण्यांना त्रास देण्याचा आनंद घेतात. असे लोक केवळ त्यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाहीत तर त्यांना विनाकारण त्रास देतात. मात्र, कधीकधी अशा लोकांना परिणामांनाही सामोरे जावे लागते. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्येही एका व्यक्तीला बैलाला त्रास देणं चांगलंच अंगलट आलं आहे. या व्यक्तीने चक्क बैलाच्या कानासमोर जोर जोरात ताशा वाजवला, मात्र त्यानंतर याचे परिणाम त्याला भोगावे लागले. त्याला त्याच्या या वागणुकीची अशी शिक्षा मिळाली की यापुढे तो प्राण्यांना त्रास देण्याचा विचारही करणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काहीतरी कार्यक्रम सुरू आहे. यावेळी जोरजोरात ताशा वाजवला जात आहे, तिथेच बाजूला बैलदेखील आहे. त्याला दोन लोकांनी पकडून ठेवलं आहे. दरम्यान, हे सगळं सुरू असताना अचानक ताशा वाजवणारा तरुण बैलाच्या जवळ जातो आणि जोरजोरात ताशा वाजवू लागतो. बैलाला याचा त्रास होतो आणि बैल आक्रमकपणे एका लाथेत तरुणाला उडवतो. बैलाची लाथ इतक्या जोरात तरुणाला लागली की तो अक्षरश: हवेत उडाला. यावेळी आजूबाजूची लोकंही अवाक् झाली. बैलानं त्या तरुणाला चांगलीच अद्दल घडवली. उगाच पाळीव प्राण्यांना त्रास दिला तर तेही आपल्याला त्रास देतात, हेच या व्हिडीओमधून पाहायला मिळालं.

हा व्हिडीओ तुम्हीही पाहा आणि सांगा, पाळीव प्राण्यांना अशाप्रकारे त्रास देणं कितपत योग्य आहे?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “एवढं प्रेम करणारा नवरा..” नवऱ्यानं बायकोसाठी बाईकच्या मागे लिहला खास मेसेज; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mngeshddii नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओला, “बैलाला ध्वनिप्रदूषणाचा त्रास झाला. त्याने आपल्या पद्धतीने उपाय केला”, असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत काहीच माहिती हाती आली नाही. पण, हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेक युजर्स त्यावर कमेंटदेखील करत आहेत. बैल तापला, कर्म, जन्माची अद्दल घडली; अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकरी देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boy teasing bull to over noise near his ear then bull revenge from boy shocking video goes viral srk