माणूस असो किंवा प्राणी त्यांच्या दिसण्यात किंवा शरीराच्या अवयवांमध्ये एखादा फरक आढळून आला, तर बघणाऱ्यांना त्या गोष्टीचं नवल वाटतं. तुम्ही माणसाचं उदाहरण बघा-एखाद्या व्यक्तीच्या पाच बोटांच्या बाजूला एखादं सहावं लहान बोट असेल, तर आपण तिच्याकडे आश्चर्यानं पाहतो. आज सोशल मीडियावर असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. पण, आज एका माणसाची नाही, तर मांजराची चर्चा रंगली आहे; जे दिसायला थोडं वेगळं आहे. कारण- या मांजरीला एक नाही तर दोन नाकं आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅट्स प्रोटेक्शन नावाचा एक अनाथाश्रम आहे. या अनाथाश्रमात ही दोन नाकं असणारी मांजर आहे. या मांजरीचं नाव नॅनी मॅकफी आहे. तसेच ही मांजर इंग्लंडमध्ये आढळून आली आहे. या काळ्या व पांढऱ्या रंगाच्या मांजरीला दोन नाकं आहेत. जेव्हा या आश्रमात ही मांजर आली तेव्हा सगळ्यांना वाटलं की, या मांजरीचं नाक फक्त मोठं आहे. पण, जसजशी ही मांजर मोठी होत गेली तसतशी तिला दोन नाकं आहेत, असं आढळून आलं. दोन नाकांची ही अनोखी मांजर एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून नक्की बघा.

हेही वाचा…VIDEO: कॅनडामध्ये स्वयंपाक करताना काय काळजी घ्यावी लागते? भारतीय महिलेनं सांगितली माहिती

पोस्ट नक्की बघा :

दोन नाके असणारी मांजर :

कॅट्स प्रोटेक्शन (catsprotection) अनाथाश्रम यांनी दोन नाकं असणाऱ्या मांजरीची महिती सांगताना लिहिलं की, चार वर्षांची एक मांजर आहे. या मांजरीला मोठं नाक असल्याचं मानलं जात होतं. पण, नंतर असं दिसून आलं की, प्रत्यक्षात तिला दोन नाकं आहेत. एका जन्मजात विकृतीमुळे नॅनी मॅकफीला हे दुसरं नाक आहे. तसेच सुदैवानं त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे आणि मांजरीचे काही क्लोजअप फोटो शेअर केले गेले आहेत.

कॅट्स प्रोटेक्शन यांच्या अधिकृत @catsprotection या ट्विटर अकाउंटवरून यासंबंधीची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. तसेच या पोस्टमध्ये या दुर्मीळ मांजरीची माहिती आणि तिचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. ही पोस्ट पाहून नेटकरी या अनोख्या मांजरीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. एक युजर प्रार्थना करीत आहे की, तिला चांगलं घर मिळेल. तर एक युजर, ही मांजर दिसायला खूपच सुंदर आहे, असे म्हणतोय. या अनोख्या मांजरीसंबंधीची सोशल मीडियावरील चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cat with two nose you will also be surprised to see the photos asp