मगर पाण्यातील धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे, जिच्या हल्ल्यातून भलेभले प्राणी वाचत नाहीत. त्यामुळे मगर पाहणं तर दूरचं नाव घेतलं तरी मनात एक भीती निर्माण होते. मगरीने प्राण्यांची शिकार केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. पण आता सोशल मीडियावर मगरीचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहूनचं तुमच्या अंगावर काटा येईल. एका प्राणी संग्रहालयात एक महिला झू ट्रेनर मगरीजवळ उभी असताना मगर तिच्या हातावर हल्ला करते, यानंतर महिलेबरोबर मगर पुढे असे काही करेते जे पाहून तुमच्याही ह्रदयाचा ठोका चुकेल.

मगरी आपल्या जबड्यात तिचा हात इतका मजबूतीने पकडते की महिलेला तो सोडवणे कठीण होते, यानंतर एक व्यक्ती तिथे धावत येतो आणि मोठ्या मेहनतीने महिलेचे प्राण वाचवतो. यावेळी झूमध्ये उपस्थित लोक, लहान मुलं हे थरारक दृश्य पाहून घाबरतात.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, प्राणीसंग्रहालयातील एका पाण्याच्या मोठ्या बॉक्समध्ये एक मगर पोहत असते. यावेळी पोहत ती जवळच उभ्या असलेल्या महिलेच्या दिशेने जाते आणि तिच्या हातावर झडप घालते. यानंतर महिलेचा हात ती आपल्या जबड्यात घट्ट पकडते आणि तिला ओढत पाण्यात खेचते. महिला तिच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करते पण मगर शेवटपर्यंत तिचा हात सोडत नाही, उलट हात सोडण्याचा प्रयत्न करत असतानाच मगर तिला दोन तीनवेळा पाण्यात गरगर फिरवते. यावेळी एक व्यक्ती तिथे येतो आणि मगरीच्या पाठीवर बसून तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करतो. अखेर काही मिनिटांनी मगरीच्या तावडीतून महिलेची सुटका होते, यावेळी मगर पाठीवर बसलेल्या व्यक्तीला खाली उतरवण्याचा खूप प्रयत्न करते पण तो व्यक्ती उठत नाही, शेवटी संधी मिळताच सुखरुपपणे तो व्यक्तीही मगरीच्या पाठीवरुन उठून बाहेर पळतो.

मगरीच्या हल्ल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ @PicturesFoIder नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो आत्तपर्यंत अनेकांनी पाहिला असून लोक त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स देत आहेत.