Mahakumbh Fact Check Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळून आला, ज्यामध्ये प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात भीषण ट्रॅफिकची समस्या निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या ट्रॅफिकमध्ये अनेक वाहनं अडकून पडली आहेत, यामुळे वाहनांतील लोकं या ट्रॅफिकमधून लवकरात लवकर सुटण्यासाठी अक्षरश: रडताना दिसतायत. पण, खरंच अशी कोणती घटना घडली का? याविषयीचे तथ्य जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

इन्स्टाग्राम युजर रवींद्र राजूने दिशाभूल करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील त्याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करत आहेत.

त्याच युजरने त्याच्या पेजवर पुन्हा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

तपास:

व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला. व्हिडीओवर ‘सुमन टीव्ही कन्नड’ असा वॉटरमार्कही आम्हाला दिसला.

आम्हाला इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला एक व्हिडीओ सापडला, ज्याच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले होते की, हा व्हिडीओ कन्नड बिग बॉसफेम तुकाली संतोषचा आहे, ज्याने गर्दीत एका कारला जोरात धडक दिली होती.

आम्हाला TV9 कन्नडवरदेखील व्हिडीओ सापडला.

आम्हाला सुमन टीव्ही कन्नडवरही एका आठवड्यापूर्वी अपलोड केलेला हाच व्हिडीओ सापडला.

हा व्हिडीओ भोजपुरी स्टार पवन सिंग आणि भोजपुरी अभिनेता निर्भय प्रताप सिंग प्रकरणाशीदेखील खोटा जोडला जात होता.

निष्कर्ष :

गर्दीने घेरलेल्या कन्नड बिग बॉस फेम तुकाली संतोष आणि त्याची पत्नी मनसा संतोषचा व्हिडीओ महाकुंभ २०२५ मधील ट्रॅफिक आणि गर्दीचा असल्याचा खोटा दावा करून व्हायरल केला जात आहे, त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fact check video of kannada bigg boss fame tukali santhosh falsely linked to mahakumbh sjr