लहान असो वा मोठे प्रत्येकाला त्यांच्या वाढदिवसाला गिफ्ट मिळाल्याने खूप आनंद होतो. जेव्हा कोणी फार विचारपूर्वक आपल्यासाठी आवडीने काही गोष्ट आणतो तेव्हा ती गोष्ट बघून जो आनंद होतो तो शब्दांत व्यक्त करता येणे अशक्य असते. त्यामुळे अनेक पालक मुले मोठी झाल्यानंतरही त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही स्पेशल गिफ्ट्स आणतात. एका वडिलांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिला एक गिफ्ट आणले; जे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या वडिलांनी गिफ्ट म्हणून मुलीला एक अस्वच्छ पाण्याने भरलेली बाटली दिली आहे. पण, हे देण्यामागे नेमके काय कारण होते हे तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले आहे. ते आपण जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वडिलांनी वाढदिवसाला दिले विचित्र गिफ्ट

पॅट्रिशिया माऊ असे या मुलीचे नाव असून, तिने वडिलांनी दिलेल्या गिफ्टबद्दल सांगताना म्हटले की, माझ्या वडिलांनी मला फर्स्ट एड किट, पेपर स्प्रे, एक एनसायक्लोपीडिया, चाव्यांचा गुच्छा, आणि माझ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेले एक पुस्तक गिफ्ट केले.

या गिफ्ट्सबद्दल ती म्हणाली की, या वर्षीचे गिफ्ट्स खूप खास आहेत. कारण- त्या गोष्टी पैशाने विकत घेता येऊ शकत नाहीत. हा माझ्या जीवनातील एक मौल्यवान धडा होता. वडिलांनी मला एक अस्वच्छ पाण्याने भरलेली बाटली गिफ्ट केली. त्याबाबत त्यांनी सांगितले की ही, अस्वच्छ पाण्याची बाटली जीवनाचे प्रतीक आहे, जेव्हा तुम्ही खूप चिंताग्रस्त असता तेव्हा तुम्हाला सगळे वाईट दिसते, चुकीचे विचार मनात येतात. परंतु, जेव्हा मन स्थिर होते तेव्हा सगळे सुरळीत चांगले दिसू लागते. म्हणजे बाटलीतील पाण्यातील कचरा वा घाणही तळाला जाऊन बसते. त्यामुळे दृष्टिकोन चांगला ठेवणे महत्त्वाचे आहे.

‘बाटली समुद्राकडे नेली आणि …’

माउने म्हटले की, ती नंतर वीकेंडला ही बाटली समुद्राजवळ घेऊन गेली आणि ती रिकामी केली. यावर तिने आणखी मेसेज दिला की, तुम्ही समुद्रातील एक थेंब नाही आहात, तर तुम्ही एका थेंबातला महासागर आहात. किंबहुना, मी त्यांचे जुने शब्द एका लेव्हलला नेले. या पोस्टचा मुद्दा असा आहे की, मी स्पष्टपणे या माणसाची मुलगी आहे.

माऊच्या पोस्टने हे स्पष्ट केले आहे की, सर्वसाधारण दिसणाऱ्या गिफ्ट्समागेही काही खोल अर्थ असू शकतो. याचा अर्थ असा आहे की, आपण वाईट परिस्थितीत संयम राखला पाहिजे. जेव्हा आपण अस्वस्थ, चिंतेत असतो तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, जीवनातील चांगल्या गोष्टी वाईट गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाच्या असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father gifts dirty water bottle to daughter as birthday gift know why it is special photo viral sjr