Video: पूजा सुरु असतानाच भाविक पडले 50 फूट खोल विहिरीत; अनेकजण थेट…

Indore Beleshwar Temple Accident : रामनवमीला गालबोट! मंदिरात यज्ञ सुरु असतानाच २५ भाविक पडले ५० फूट विहिरीत

Indore Roof of temple stepwell collapses
यज्ञ सुरु असतानाच 25 भाविक पडले विहिरीत

Indore Beleshwar Temple Accident:  आज देशभरात राम नवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी प्राचीन राम मंदिरांमध्ये श्रीराम जन्माचा उत्सव पार पडला. दरम्यान रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेश येथील श्री बेलेश्वर महादेव झूलेला मंदिरातील बावडीवर असलेलं छत कोसळलं आहे. यामुळे काही भाविक मंदिराच्या आवारातील विहिरीमध्ये पडल्याची माहिती आहे. सध्या भाविकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.राम जन्मोत्सवानिमित्त भाविक जमले असताना अशी घटना घडल्याने इंदौरमध्ये खळबळ माजली आहे.

50 फूट खोल विहीरीत भाविक पडले –

इंदूरमधील स्नेह नगरजवळ असलेल्या पेटल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिर आहे. या जुन्या मंदिरात भाविक राम जन्मासाठी जमले होते. रामाच्या मूर्तीसमोर पूजा, आरतीसाठी लोक उभे होते. मात्र ते ज्या ठिकाणी उभे होते, तिथे एक प्राचीन विहिरही होती. त्यावर सिमेंटचा स्लॅब बांधला होता. त्या स्लॅबवर २०-२५ जण त्यावर उभे असतानाच अचानक हे झाकण खाली गेलं अन् त्यावर उभे लोक थेट विहिरीत कोसळले.

पाहा ट्विट –

हेही वाचा – वैतागलेल्या महिलेनं बॉसवर काढला राग; पुढे बॉसने जे केलं ते पाहून म्हणाल वाहह…

या घटनेची माहिती मिळताच मंदिर परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला. या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकवस्ती असून गल्ल्या आहेत. त्यामुळेच मदतकार्य पोहचवणाऱ्या टीम्सला मंदिराच्या अधिकजवळपर्यंत जाण्यात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. या विहिरीमध्ये पडलेल्या काही भाविकांना वर काढून त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे. बघ्यांची मोठी गर्दी झाली असल्यामुळेही मदतकार्यात अडथळा येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 15:29 IST
Next Story
हेलीकॉप्टरमधून घेऊ शकता केदारनाथचे दर्शन, काय आहे हे IRCTCचे खास पॅकेज, जाणून घ्या
Exit mobile version