Premium

भारीच! शेतकऱ्याच्या ‘या’ देसी जुगाडासमोर अभियंतेही पडले फिके; हा व्हिडिओ एकदा बघाच!

शेतीच्या कामासाठी तयार केलेले जुगाड सोशल मीडियावर अधिक व्हायरल होत असतात. हा व्हायरल झालेला जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Desi Jugaad Video
शेतकऱ्याचा जुगाड पाहून अख्खा देश झालाय हैराण (फोटो: युट्युबवरुन साभार)

शेतीच्या कामासाठी तयार केलेले जुगाड लोकांना अधिक आवडतात. कारण केलेल्या जुगाडामुळे शेतकऱ्याचा अधिक वेळ वाचतो त्याचबरोबर खर्चही वाचतो. त्याचबरोबर शेतीचं काम सुध्दा वेळेत होतं असं अनेकदा पाहायला मिळालं आहे. शेतीच्या कामासाठी तयार केलेले जुगाड सोशल मीडियावर अधिक व्हायरल होताना दिसतात. शेतीच्या कामाच्या अनुषंगाने आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचे अनेक जुगाड यंत्र तयार केली आहेत. पुन्हा असाच एक जुगाड एका शेतकऱ्याने शेतात केला असून ‘हा’ देसी जुगाड सोशल मिडीयावर  तुफान व्हायरल होत आहे. शेतकऱ्याने काय नेमकं केलं ? चला जाणून घेऊया सविस्तर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुगाडाची सोशल मिडीयावर कौतुकाची थाप

“संजित शुक्ला” नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर युजर्सला झपाट्याने आकर्षित केले आहे. हा व्हिडिओला लोकांची पसंती मिळत आहे.

(हे ही वाचा : Video : तरुणाने बाजारातून विकत न घेता स्वतःसाठी घरच्या घरी तयार केले ‘असे’ मीठ )

…म्हणून शेतकऱ्यानं ‘हा’ जुगाड करण्याचं ठरवलं

गव्हाचे पीक कापणीनंतर थ्रेशरमध्ये मळणी केली जाते, जेणेकरून भुसा गव्हापासून वेगळा होईल. मग दोन्ही स्वतंत्रपणे गोळा केले जातात, ट्रॅक्टर किंवा ट्रॉलीमध्ये लोड केले जातात आणि दुसऱ्या ठिकाणी हलवले जातात. हे करतांना वेळही जातो आणि त्यामागं प्रचंड मेहनत घेतली जाते. ही अडचण दूर करण्यासाठी या शेतकऱ्याने उपाय शोधला, ज्यात मेहनत आणि वेळ दोघांची बचत होताना दिसते. शेतकऱ्याच्या या जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

काय आहे ‘हा’ जुगाड?

या व्हिडीओमध्ये एक युक्ती वापरली आहे. शेतातील गव्हाची काढणी केल्यानंतर थेट ट्रॉलीमध्ये भुसा टाकला आहे. इतकच नाही तर, शेतकऱ्यानं ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये व्हॅक्यूम क्लिनर बसवला आहे, जो पेंढा हवेसह आतमध्ये खेचतो. यामुळे झालं असं की, कोणतेही प्रयत्न न करता ही रिकामी ट्रॉली भरली जाते. म्हणजे, कुठलाही वेगळा खर्च आणि वेळ न घालवता हे काम काही मिनिटांतच पूर्ण होते. शेतकऱ्याच्या या जुगाडाचं सोशल मिडीयावर कौतुक होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jugaad video the farmer filled the chaff without a trolley by using a home made jugaad viral video pdb

First published on: 25-09-2023 at 17:57 IST
Next Story
कपलचे मेट्रोमध्ये अश्लिल चाळे, किस करत…Video पाहून नेटकरी म्हणतायेत,”मुलाला नाहीतर मुलीला तरी..”