Desi jugad Viral video: भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील. सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे-मुंबईतल्या महिलांचं टेंशनच गेलं

याआधी तुम्ही अनेक वेगवेगळे जुगाड पाहिले असतील मात्र यापेक्षाही खतरनाक जुगाड समोर आला आहे. यामुळे आता पुणे-मुंबईतल्या महिलांचं टेंशनच जाणार आहे. गव्हाचं पीठ आज दुकानात सहज उपलब्ध होतं. पण तरी देखील आजही आपल्यापैकी अनेकांच्या घरात गहू आणून ते व्यवस्थित निवडले जातात आणि मग चक्कीवर दळून त्याचं पीठ तयार केलं जातं. त्यात काही घरं अशीही असतील जिथे निवडलेला गहू व्यवस्थित धुवून छतावर सुकवला जातो आणि मग पीठ तयार करण्यासाठी गिरणीवर पाठवला जातो. मात्र मुंबई-पुण्यासारख्या शहरात जर तुम्ही राहात असाल तर धुतलेला गहू सुकवायला फॅन शिवाय पर्याय नाही. कारण घरं इतकी लहान असतात की तिथे छत वगैरे असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.असो, पण या समस्येवर एका तरुणानं खतरनाक जुगाड शोधून काढलाय. जुगाडूगीरीमध्ये आपल्या भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही. कारण आपली लोकं असे असे जुगाड शोधून काढतात की पाहणारा सुद्धा अवाक होतो. आता हाच जुगाड पाहा ना, एका तरुणानं ओले गहू सुकवण्यासाठी चक्क वॉशिंग मशिन वापरली आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही एका तरुणाला पाहू शकता, जो वॉशिंगमशिनमध्ये गहू सुकवतोय. होय, आजवर तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले असतील पण पठ्ठ्या चक्क धान्य सुकवतोय. त्यानं आधी सर्व भिजवलेले गहू एका कपड्यात घट्ट बांधले आणि मग हे गाठोडं ड्रायरमध्ये ठेवलं. आणि बसं अगदी पाच ते सात मिनिटांत कपडे जसे वाळतात अगदी त्याच प्रमाणे गहू कोरडे होऊन बाहेर पडले.

पाहा व्हिडीओ

@altu.faltu नावाच्या हँडलने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले “नाद करा पण आमचा कुठं” या व्हिडिओला ४७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man uses washing machine for drying wheat desi jugaad funny video goes viral on social media srk