सध्या नागपूर म्हटले की तिथल्या प्रसिद्ध संत्र्यांपेक्षा, ‘डॉली चायवाला’चे नाव सगळ्यात पहिले घेतले जाते. त्याला कारणदेखील तसेच आहे. मध्यंतरी याच डॉलीने चक्क मायक्रोसॉफ्टच्या सीईओला, बिल गेट्सला त्याच्या हाताने चहा बनवून प्यायला दिला होता. मात्र, सध्या डॉली पुन्हा एकदा तुफान चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे त्याने त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून शेअर केलेले मालदीवमधले फोटो आणि व्हिडीओ.

सध्या डॉली मालदीवमध्ये असून, त्याने त्याच्या प्रवासाबद्दल आणि मालदीवमधले काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामध्ये डॉलीने मालदीवच्या लोकांसह तसेच तेथील बड्या व्यक्तींसह फोटो काढले असल्याचे आपण पाहू शकतो. मात्र, सध्या ‘बॉयकॉट मालदीव’ सुरू असताना अचानक डॉलीने तिथे गेलेले त्याच्या चाहत्यांना तसेच नेटकऱ्यांना पसंत पडले नसल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून समजते.

हेही वाचा : हे काय भलतंच! Breakup केला म्हणून प्रेयसीचे चोरून नेले टॉयलेट? पाहा हा Photo

डॉली चायवाल्याच्या मालदीव भेटीबद्दल नेटकरी नेमके काय म्हणत आहेत ते पाहूया.

“आपल्याकडे एवढे मोठे लक्षद्वीप असून हा मालदीवला का गेला?” असे एकाने लिहिले आहे.
“मान्य आहे की मालदीव सुंदर आहे, पण आपल्याकडेही लक्षद्वीपसारखी प्रचंड सुंदर जागा आहे. मालदीवच्या लोकांनी कसे आपल्या देशाला, आपल्या पंतप्रधान मोदींना नावं ठेवली ते विसरून चालणार नाही”, असे दुसऱ्याने लिहिले आहे.
“डॉली चायवालाला अनफॉलो करायची वेळ आली आहे”, असे म्हणून तिसऱ्याने नाराजी व्यक्त केली.

मात्र काहींनी, “डॉली चायवाला नव्हे, डॉली बिल गेट्सचा मित्र!” असे लिहिले आहे. तर काहींनी “आपला भाऊ स्वतःच्या मेहनतीवर प्रसिद्ध झाला आहे”, असेही लिहिले असल्याचे पाहायला मिळते.

डॉलीने त्याच्या इन्स्टाग्रामवरील @dolly_ki_tapri_nagpur नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्या व्हिडीओला २६९K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.