जगभरात अशा अनेक जागा आहेत जिथे चित्रविचित्र दावे केले जातात. अशीच एक जागा आहे तुर्कीच्या प्राचीन शहर हिरापोलीस येथे. इथे एक प्राचीन मंदिर आहे आणि हे मंदिर नरकाचे द्वार असल्याचा दावा केला जातो. जो कोणी या मंदिराजवळ जातो त्याचा मृत्यू होतो आणि जर कोणी या मंदिरात प्रवेश केला तर त्याचे शरीर सापडत नाही असे या मंदिराबाबत म्हटले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायन्स अलर्ट डॉट कॉमनुसार, या जागेला ‘नरकाचे द्वार’ म्हटले जाते. कारण मागील काही वर्षांपासून इथे रहस्यमय मृत्यू होत आहेत. सगळ्यात रहस्यमयी गोष्ट अशी की या मंदिराच्या संपर्कात येणारा कोणताही प्राणी मृत्यू पावतो. ग्रीक देवाच्या विषारी श्वासाने या मंदिराच्या संपर्कात येणारे सर्व प्राणी मृत्युमुखी पडतात अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. ग्रीको-रोमन काळात मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचा शिरच्छेद केला जात असे.

Video : प्रजासत्ताक दिनानिमित्त जवानाने गायले अप्रतिम गाणे; व्हिडीओ पाहून तुमचाही उर अभिमानाने भरून येईल

असे म्हटले जाते की या मंदिराच्या संपर्कात आल्याने मनुष्य, प्राणी आणि पक्षीही मरतात. इथे सतत होणाऱ्या मृत्यूंमुळे लोक या मंदिराला ‘द गेट ऑफ हेल’ म्हणजेच मृत्यूचे द्वार म्हणतात. ग्रीक आणि रोमन काळातही लोक या मंदिरात यायला घाबरत असत.

या मंदिराजवळील लोकांच्या रहस्यमयी मृत्यूचे गूढ वैज्ञानिकांनी सोडवले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, मंदिराच्या खालून सतत विषारी कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडत असतो. यामुळेच मानव, प्राणी, पक्षी यांचा या जागेशी संपर्क येताच त्यांचा मृत्यू होतो.

Viral Video : दरीत अडकलेल्या ट्रकचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

शास्त्रज्ञांना मंदिराच्या खालील गुहेत मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड सापडले. साधारणपणे, फक्त १० टक्के कार्बन डायऑक्साइड ३० मिनिटांत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू करू शकतो, परंतु मंदिराच्या गुहेत विषारी वायूचे प्रमाण ९१ टक्के आहे. त्यामुळे या मंदिराच्या संपर्कात येणाऱ्या कीटक, प्राणी, पक्षी, माणसांचा मृत्यू होतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This temple is called the gate of hell find out the reason behind this pvp
First published on: 27-01-2022 at 17:26 IST