scorecardresearch

Viral Video : दरीत अडकलेल्या ट्रकचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये एका डोंगराळ रस्त्यावरून जाणारा एक ट्रक रस्तेबांधणीदरम्यान दरीच्या बाजूला अडकलेला दिसत आहे.

viral truck video
हा ट्रक केवळ अडकला नाही तर दरीत कोसळतानाही दिसत आहे. (Photo : Instagram/@memewalanews)

सोशल मीडियावर दररोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. यामध्ये असे काही व्हिडीओ असतात जे बघून सर्वच हैराण होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये एका डोंगराळ रस्त्यावरून जाणारा एक ट्रक रस्तेबांधणी दरम्यान दरीच्या बाजूला अडकलेला दिसत आहे. हा ट्रक केवळ अडकला नाही तर दरीत कोसळतानाही दिसत आहे. या ट्रकचा चालक रस्त्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय ट्रक पुढे घेऊन आला. परंतु पुढे काय होणार आहे याची त्याला कल्पना नव्हती. सोशल मीडियावर हा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो नेमकं काय घडलंय. एक ट्रकचालक डोंगराळ रस्त्यावर ट्रक चालवत आहे. ट्रकचालक ज्या रस्त्यावरून ट्रक चालवत होता तो रस्ता अतिशय अरुंद होता आणि तिथून एका वेळी एकच वाहन जाऊ शकत होते. पुढे बांधकाम सुरु होते म्हणून त्याला तिथे थांबावे लागले. यानंतर जे झाले ते पाहण्यासारखे आहे. हा ट्रक पुढेही जाऊ शकत नव्हता आणि मागेही जाऊ शकत नव्हता. एका क्षणाला असे वाटते की हा ट्रक दरीत तर कोसळणार नाही ना.

Viral Video : रुग्णाचा उपचार करण्यासाठी नर्सने लढवली शक्कल; सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

Google Doodle : ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गूगलने भारतीयांना दिल्या शुभेच्छा; सादर केले खास डूडल

अशा वाईट परिस्थितील कोणी अडकले असेल तर त्याचे डोकं काम करणे बंद करेल. हा ट्रकचालक या डोंगराळ रस्ता आणि अत्यंत खोल दरी यांच्यामध्ये अडकला असून तो काहीही करू शकत नाही. memewalanews या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shocking video of a truck stuck in a valley goes viral on social media pvp

ताज्या बातम्या