Video Shows Women Clean Fan With Help Of Water Bottel : सणासुदीच्या काळात आपण सगळ्यात पहिल्यांदा घराची स्वछता करून घेतो. त्यामध्ये पंखा साफ करणे हे महत्त्वाचे काम असते. पण, अनेकांना हे काम करायला कंटाळा येतो. कारण- पंखा उंचावर असल्यामुळे जमिनीवर टेबल-खुर्ची ठेवून, त्यावर चढून पंखा साफ करावा लागतो. त्यामुळे हे काम करण्यासाठी अनेक जण टाळाटाळ करतात. पण आज व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये घरातील पंखा साफ करण्यासाठी एक जुगाड शोधून काढल्याचे दिसत आहे. या जुगाडाद्वारे चुटकीसरशी पंखा साफ करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओ (Video) एका महिलेने शूट केला आहे. महिलेने बाटली आणि कपड्यांच्या मदतीने पंखा साफ करण्यासाठी एक घरगुती मॉप बनवला आहे; ज्यामुळे काही मिनिटांत पंखा साफ होणार आहे. तसेच पंखा साफ करण्यासाठी तुम्हाला खुर्ची किंवा टेबलाचीसुद्धा गरज पडणार नाही. तर, ती महिला सुरुवातीला हा मॉप बनविण्यासाठी प्लास्टिकची बाटली दोन्ही बाजूंनी समान रीतीने कापते. नंतर एक जुने कापड घेऊन बाटलीच्या आतमध्ये ठेवून धागा किंवा कापडाने बांधला आहे. पंखा साफ करण्याचा हा जुगाड व्हायरल व्हिडीओतून बघा…

हेही वाचा…बाप्पाच्या कानात इच्छा सांगणारे काका; निरोप देताना नक्की काय म्हणाले? VIDEO तून पाहा

व्हिडीओ नक्की बघा…

पंखा साफ करण्याचा जुगाड :

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, घरगुती मॉप बनविण्यासाठी एक महिला प्लास्टिकच्या बाटलीचा उपयोग करते. प्लास्टिकची बाटली दोन्ही बाजूंनी समान रीतीने कापून त्यात दोन्ही बाजूंना वेगवेगळे कापड ठेवते आणि धाग्यांनी बांधून ठेवते. त्यानंतर बाटलीचे झाकण कापून घेते. कापलेलं झाकण बाटलीच्या मध्यभागी लावते आणि त्यात एक काठी जोडून घेते. नंतर पंखा साफ करण्यास सुरुवात करते. महिलेने पंखा साफ करण्याचा हा जुगाड व्हॉइस ओव्हरद्वारे व्हिडीओत सांगितला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @misscrafty20 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून युजर्स संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काही जणांना हा जुगाड आवडला असून, ते या महिलेचे कौतुक करीत आहेत. तर अनेक जण, “एवढं सगळं करण्यात जेवढा वेळ गेला, तितक्यात दोन पंखे साफ करून झाले असते”, आदी स्वरूपाच्या अनेक कमेंट्स करीत महिलेला ट्रोल करतानाही दिसत आहेत. आपले काम सोप्या पद्धतीने व्हावे यासाठी प्रत्येक जण शॉर्टकर्टचा उपयोग करीत असतो याचे आणखीन एक उदाहरण या व्हिडीओत पाहायला मिळाले आहे.