Viral Video Narendra Modi Best Friend PM Modi Says I can not hide anything from them | Loksatta

Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा BFF कोण? मोदींनीच केला खुलासा म्हणाले, तो शिक्षित नसला तरी..

PM Modi Viral Video: एका कार्यक्रमात मोदींनी आपल्या अशाच एका खास व्यक्तीविषयी सांगितले होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

PM Narendra Modi
(संग्रहित छायाचित्र)

PM Narendra Modi Best Friend: जेव्हा आपल्याला आयुष्यात चांगली वाईट बातमी मिळते, तेव्हा आपल्याला सर्वांना ती एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत, विश्वासू व्यक्तीसोबत, मित्रासोबत शेअर करायची असते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी व्यक्ती असतो ज्याला सांगितल्याशिवाय खरा आनंदच साजरा करता येत नाही, ज्याला आपल्याबद्दल सर्व गोष्टी माहित असतात. या जगमान्य सवयीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अपवाद नाहीत. एका कार्यक्रमात मोदींनी आपल्या अशाच एका खास व्यक्तीविषयी सांगितले होते. हा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका पत्रकाराने पंतप्रधान मोदींना त्यांच्या BFF म्हणजेच बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर विषयी विचारणा केली. यावर मोदींनी दिलेले उत्तर नेटकऱ्यांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. मोदी म्हणतात, प्रत्येकाकडे अशी व्यक्ती असावी ज्याच्यापासून काहीच लपवले जात नाही.

मोदी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी व्यक्ती असली पाहिजे, ती व्यक्ती शैक्षणिक किंवा सामाजिक स्टेटसने किती मोठी आहे हे महत्त्वाचे नाही, पण कधीकधी हीच व्यक्ती आपल्याला आयुष्याचे सार समजावून देते जे कधी कुण्या पंडितालाही शक्य होणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा BFF

विश्लेषण : पंतप्रधान मोदींचे बालपणीचे मित्र ‘अब्बास’ कुठे आहेत?

पीएम मोदी म्हणाले होते की आरएसएसच्या दिवसांपासून त्यांचे सर्वात चांगले मित्र लक्ष्मणराव इनामदार होते, ज्यांना ते प्रेमाने ‘वकील साहब’ म्हणत. जे लोक नरेंद्र मोदींना त्यांच्या सुरुवातीच्या काळात ओळखत होते ते म्हणतात की लक्ष्मण राव यांचा पंतप्रधानांच्या सुरुवातीच्या वर्षांवर सर्वात मोठा प्रभाव होता. या वकील साहेबांवर मोदींनी एक पुस्तकही लिहिले आहे. लक्ष्मणराव इनामदार यांचे १९८४ मध्ये निधन झाले.

दरम्यान, सध्या मोदींच्या आयुष्यात हे स्थान असलेल्या व्यक्तीचे नाव सांगण्यास पंतप्रधानांनी नकार दिला. यावरही कारण सांगताना मोदी म्हणतात, तुमच्या जवळच्या व्यक्तीला ती व्यक्ती तुमच्या जवळ आहे हे कळले नाही तरच उत्तम ठरेल. कारण तुमच्या आयुष्यातील त्यांचे महत्त्व त्यांना समजल्यास त्यांची वागणूक वेगळी होण्याची शक्यता असते असेही मोदी म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-09-2022 at 14:00 IST
Next Story
Navratri 2022 : माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांचा गरबा डान्स; पाहा Viral Video