Viral Video: ईएमआयद्वारे पैसे भरून नवीन बाइक खरेदी करणे आता अधिक सोपं झालं आहे. पण, बाईकच्या मालकाला बाइक कशी चालवायची हे माहिती असणेही आवश्यक आहे. पण, तरीही आपल्याकडे बाईक आहे ही गोष्ट दाखवण्याला लोक जास्त प्राधान्य देतात आणि याच गोष्टीमुळे रस्त्यावर गंभीर अपघात होत असतात. आज सोशल मीडियावर अशीच एक घटना घडली आहे. एका व्यक्तीने रस्त्यावरील दोन बाईकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. नक्की काय घडलं ते या लेखातून सविस्तर जाणून घेऊ.

इन्स्टाग्रामवर मोटो व्लॉगर आकाशने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओ एक अज्ञात दुचाकीस्वार हा व्हिडीओ शूट करते आहे. रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरु असते. तितक्यात कॅमेरात एक दृश्य कैद होते. एक दुचाकीस्वार वेगात गाडी घेऊन येतो आणि दोन वाहनांना ओव्हर टेक असतो.यादरम्यान रॉयल एनफिल्ड बुलेट चालवणाऱ्या चालकास तरुणाची बाईक जोरात आदळते. पण, बुलेट चालक तोल सावरतो. मग त्या ओव्हर टेक करणाऱ्या तरुणाचे काय होते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…मिशन स्वच्छता! भारताला स्वच्छ देश बनवण्याचे आनंद महिंद्रांचे स्वप्न; VIDEO शेअर करीत म्हणाले… ‘स्वप्न पाहण्यात मदत’

पोस्ट नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक केटीएम आणि रॉयल एनफिल्ड बुलेट एकमेकांच्या जवळून जात आहेत. अचानक एक अज्ञात तरुण लाल रंगाची बाईक घेऊन येतो आणि रॉयल एनफिल्ड बुलेटला धडकतो. बुलेट चालकाने पटकन त्याचा तोल सावरला. तर ओव्हरटेक करणारा तरुण बाईकसह रस्त्यावर आदळला ; जे पाहून तुम्ही देखील थक्क होऊन जाल.सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @motovlogger_akash’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘लाइव्ह बाइक क्रॅश’ ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे ; जो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

दररोज रस्ते अपघातात शेकडो लोकांना आपला जीव आपला जीव गमवावा लागतो. अतिवेगाने वाहन चालवणे, ओव्हर टेक करणे, स्टंटबाजी करणे तर हेलमेट न घालणे आदी अनेक कारणांमुळे अपघात होत असतात. त्यामुळे कायद्याचे पालन न केल्यास वाहतूक पोलीस चलान कापतात. तरीही आपल्यातील बरेच जण अतिघाई करून अनेक वाहनांना ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात ; जे व्हायरल व्हिडीओत आज पाहायला मिळालं आहे. एक दुचाकीस्वार दोन वाहनांना ओव्हर टेक करायला जातो आणि स्वतःच संकटात सापडतो ; जे तुम्ही व्हायरल व्हिडीओत पाहिलं असेल.