Viral Video Show Man Buys 10Kg Gold Chain For Buffalo :  पाळीव प्राण्यांसाठी माणूस काय काय करेल याचा काही नेम नाही. कित्येक पाळीव प्राण्यांचे पालक प्राण्यांसाठी प्रवास बॅग, नवनवीन कपडे, त्यांना पायात घालायला शूज, एवढेच नव्हे तर त्यांच्यासाठी छोटंसं घरदेखील बांधतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. त्यामध्ये म्हशीला बांधण्यासाठी दोरी नाही, तर सोन्याची साखळी विकत घेतली आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलंत…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओत एका म्हशीला बांधून ठेवलं आहे. एक जण म्हशीला पकडून उभा आहे आणि दुसरा माणूस दागिन्यांच्या डब्यातून एक सोन्याची साखळी घेऊन येतो. पाळीव प्राण्याचा मालक दागिन्यांचा बॉक्स उघडतो आणि दुसरी व्यक्ती बॉक्समधील सोन्याची साखळी हातात घेऊन म्हशीच्या गळ्याभोवती बांधते. म्हशीसाठी केलेली सोन्याची साखळी तुम्हीसुद्धा एकदा व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…डॉली चहावाला, वडापाव गर्लनंतर मोमोज विकणाऱ्या तरुणीची चर्चा; VIRAL VIDEO तील ‘तिचा’ नम्रपणा जिंकेल तुमचंही मन

व्हिडीओ नक्की बघा…

अनेक जण प्राण्यांवर जीव ओवाळून टाकतात हे ऐकलं होतं. पण, आज तर चक्क म्हशीसाठी १० किलो सोन्याची साखळी तयार केल्याचा व्हिडीओ सादर झाला आहे. गावाकडे शेतकऱ्यांचं घर चालवायला या म्हशी खूप मदत करतात. म्हशीचं दूध विकून अनेक शेतकरी त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवतात. मग अशा आपल्या उपयुक्त म्हशीसाठी काहीतरी खास करायचं म्हणून की काय या व्यक्तीनं सोन्याची साखळी तयार केली आहे आणि ती म्हशीच्या गळ्यात घातली आहे; जे पाहून त्या व्यक्तीचं खूप कौतुक वाटतं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @king_creator787 या इस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “१० किलो सोन्याची साखळी गाईसाठी… किती रुपयांची असेल?”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. युजरने म्हशीऐवजी कॅप्शनमध्ये गाय म्हटलं आहे. पण, कॅप्शन वगळता व्हायरल व्हिडीओ काही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. अनेक युजर्स संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काही युजर्सना ही सोन्याची साखळी स्प्रे पेंट केलेली वाटते आहे. तसेच अनेक जण ‘संपत्तीचा देखावा करण्यात पैसे वाया घालवू नका’, असं म्हणताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows man tying an animal not with a rope but with a 10kg gold chain watch ones its all about love asp