Viral Video : समुद्र किनाऱ्यावर वावरताना सतर्क राहण्याचे नेहमी आवाहन केले जाते. अनेकदा सोशल मीडियावर समुद्राच्या लाटेत लोकं वाहून गेल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही लोक तर समुद्र किनाऱ्यावर गाड्या घेऊनही जाताना पाहायला मिळतात. यावेळी वाळूत गाडी घसरण्याची किंवा अपघात होण्याची शक्यता असते. तरीही लोक यातून धडा न घेता समुद्र किनाऱ्यावर कार, बाईक घेऊन येतात. अशाच एका कारचा समुद्र किनाऱ्यावर अपघात झाला असून त्याचा थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 एक व्यक्ती अगदी मृत्यूच्या दारात होता, पण म्हणतात ना काळ आला होता वेळ नाही… याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून यतो. मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. मात्र काहीजण मृत्यूच्या दारातून माघारी येतात. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

कुवेतच्या अबू अल हसनिया बीचवर झालेल्या भीषण अपघातात कारचालक चमत्कारिकरित्या कसा वाचला याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हा कार ड्रायव्हर मृत्यूच्या दारातून कसा बचावला याचा थरार तुम्हीही पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कार समुद्रकिनाऱ्यावर फिरताना दिसत आहे. अचानक चालकाचे गाडीवरी नियंत्रण सुटते अन् गाडी थेट पलटी होते. गाडी वाळूत घसरते आणि पलटते. एक दोन वेळा नाहीतर अेक वेळा ही कार गोल गोल फिरते. मात्र यावेळी कारच्या खिडकीतून कारचालक हवेत फेकला जातो आणि समुद्रातील पाण्यात पडताना दिसत आहे. ३४ वर्षीय ड्रायव्हर तोल सांभाळण्यासाठी धडपडत असल्याचे दिसते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंबईतील बेस्ट बस चालकाचा बेजवाबदारपणा; सिग्नल तोडला अन्… VIDEO पाहून बसेल धक्का

हा व्हिडीओ @Kapyoseiin नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. घटनास्थळी आल्यावर, अधिकाऱ्यांना वाहन किनाऱ्यावर उलटल्याचे दिसले. त्यानंतर जनरल अग्निशमन विभागाला सूचित करुन गाडी बाहेर काढण्यात आली. सुदैवाने कारचालकाला किरकोळ जखम झाली असल्याची माहिती मिळतेय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video speeding car flips multiple times on kuwaits abu al hasaniya beach throws driver in air dramatic visuals captured on camera srk