८००० मीटर पेक्षा उंच असणारे पाच पर्वत सर करणारी प्राजक्ता मोहिते आहे तरी कोण? जाणून घ्या तिचा प्रवास | Who is Priyanka Mohite who climbs five mountains which are higher than 8000 meters? Know her journey | Loksatta

८००० मीटर पेक्षा उंच असणारे पाच पर्वत सर करणारी प्रियंका मोहिते आहे तरी कोण? जाणून घ्या तिचा प्रवास

सातारा येथील प्रियंका, ८,००० मीटरपेक्षा जास्त उंची असलेली पाच शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.

८००० मीटर पेक्षा उंच असणारे पाच पर्वत सर करणारी प्रियंका मोहिते आहे तरी कोण? जाणून घ्या तिचा प्रवास
३० वर्षीय प्रियांका मोहितेच्या नावावर एकापेक्षा एक विक्रमांची नोंद आहे. (Photo : Instagram/@priyankamohite11)

गिर्यारोहक प्रियंका मोहिते हिने इतिहास रचला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील प्रियंका, गुरुवारी कांचनजंगा पर्वतावर चढाई केल्यानंतर ८,००० मीटरपेक्षा जास्त उंची असलेली पाच शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.

३० वर्षीय प्रियांका मोहितेच्या नावावर एकापेक्षा एक विक्रमांची नोंद आहे. प्रियंका मोहिते हिने गुरुवारी संध्याकाळी ४ वाजून ५२ मिनिटांनी जगातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कांचनजंगा सर करून ही मोहीम पूर्ण केली आहे. या पर्वताची उंची ८,५८६ मीटर आहे.

प्रियांका मोहितेला २०२० मध्ये तेनझिंग नोर्गे साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिने एप्रिल २०२१ मध्ये अन्नपूर्णा शिखर सर केले होते जे जगातील दहावे सर्वोच्च शिखर आहे. त्याची उंची ८,०९१ मीटर आहे. ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीची ५ शिखरे सर करणारी ती पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे. प्रियंका मोहितेने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट देखील सर केले आहे.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

माउंट एरेस्टची उंची ८,८४९ मीटर आहे. तिने ल्होत्से पर्वतही सर केला आहे. या पर्वताची उंची ८,५१६ मीटर आहे. वयाच्या ३०व्या वर्षी प्रियंका मोहितेने ८,४८५ मीटर उंचीचा मकालू पर्वत देखील सर केला आहे. तिने ८,८९५ मीटर उंचीवरील किलीमांजारो पर्वतावरही चढाई केली आहे.

“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर

प्रियंका मोहितेला नेहमीच पर्वत चढण्याची आवड होती. त्याने किशोरवयातच पर्वत चढायला सुरुवात केली. त्याच वयात तिने महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांवर चढाई केली होती. २०१२ मध्ये तिने हिमालयातील गढवाल विभागातील बंदरपंच पर्वतावर चढाई केली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-05-2022 at 16:01 IST
Next Story
Silver Bus! एकाच खासगी बसमधून तीन दिवसात दोन वेळा पकडली २६ क्विंटल चांदी