बाइक चालवताना हेल्मेट घालणे खूप गरजेचे असते. केवळ नियमांपुरते नाही तर स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट घातले पाहिजे. अनेक शहरांमध्ये बाइक चालकासह त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. यामुळे अनेक चालक आपल्याला हेल्मट घालून बाइक चालवताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर बाइकच्या मागे बसलेल्या आणि डोक्यात हेल्मेट घातलेल्या एका तरुणीचा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काही वेगळं दिसणार नाही. पण जेव्हा तुम्ही नीट बघाल तेव्हा तुम्हाला तरुणीने हेल्मेट घातलाना केलेली एक मजेशीर चूक दिसून येईल. जी समजल्यानंतर तुम्हीही पोट धरुन हसाल. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये एक तरुणी एका पुरुषासोबत बाइकवर बसलेली आहे. तर कारमध्ये बसलेल्या लोकांनी हा व्हिडीओ शूट केला आहे, हे दृश्य पाहून ते इतके हसले की, व्हिडीओमध्ये त्यांच्या हसण्याचे आवाजही स्पष्ट ऐकू येत आहेत.

पण तुम्हालाही अजून या व्हिडीओमध्ये हसण्यासारखे काय आहे? असा प्रश्न पडला असेल. व्हिडीओमध्ये एक पुरुष बाइक चालवत आहे, त्याच्या मागे एक तरुणी बसली आहे. दोघेही ट्रॉफिकमध्ये अडकले असून ते अरुंद रस्त्यावरून बाइक काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी दोघांनीही हेल्मेट घातले आहे. पण तरुणीने घातलेल्या हेल्मेटमुळे खरतर सगळ्यांना हसू येत नाही. कारण त्या पुरुषाने डोक्यावर हेल्मेट जसा घालायचा असतो तसा घातला आहे. मात्र तरुणीने चुकीच्या पद्धतीने हेल्मेट घातले आहे. तिने हेल्मेटचा मागचा भाग पुढे आणि पुढचा माग असे उलटे हेल्मेट घातले आहे, याच कारणामुळे कारमध्ये बसलेल्या लोकांनी हसून त्या तरुणीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.

@ThebestFigen या ट्विटर अकाउंटवर हा मजेशीर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, तिने हेल्मेट कसेही घातले तरी तिला आरामदायी वाटले पाहिजे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, महिलेने हेल्मेट घालण्याचा नवीन पद्धत शोधली आहे. अशाप्रकारे युजर्स या मजेशीर व्हिडीओवर भारी-भारी कमेंट्स करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman sit on bike and wearing wrong helmet video viral sjr