Video: गाणी ऐकत विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्या मुलाला ट्रॅफिक पोलिसाने पकडले अन्...; पुढे काय झाले एकदा पाहाच | Young boy riding a scooter without a helmet gets caught by a traffic cop see what happens next in this viral video | Loksatta

Video: गाणी ऐकत विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्या मुलाला ट्रॅफिक पोलिसाने पकडले अन्…; पुढे काय झाले एकदा पाहाच

विनाहेल्मेट गाडी चालवणे धोक्याचे ठरू शकते हा महत्त्वाचा संदेश या व्हिडिओतून देण्यात आला आहे

Video: गाणी ऐकत विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्या मुलाला ट्रॅफिक पोलिसाने पकडले अन्…; पुढे काय झाले एकदा पाहाच
ट्रॅफिक पोलिसांनी मुलाला पकडल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे (फोटो: सोशल मिडीया)

अनेकजणांना विनाहेल्मेट गाडी चालवताना तुम्ही पाहिले असेल. हेल्मेट घातले नाही तर दंड भरावा लागेल या भीतीने काहीजण फक्त लांबून पोलीस उभे असलेले दिसले की लगेच हेल्मेट घालतात. हेल्मेट सक्तीचा नियम हा आपल्याच सुरक्षेसाठी करण्यात आला आहे हे अनेकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे काहीजण नियम तोडून उलट पोलीस, ट्रॅफिक हवालदार यांच्याशी वाद घालत असलेले आपण पाहिले असेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असणारे अधिकारी दिपांशू काब्रा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा विनाहेल्मेट, एअरफोनवर गाणी ऐकत गाडी चालवत असल्याचे दिसताच तिथल्या ट्रॅफिक पोलिसाने त्याला अडवलेले दिसत आहे. नियम तोडल्याबद्दल त्याला विचारण्यात आल्यानंतर त्याने काय उत्तर दिले पाहा.

आणखी वाचा: कुत्र्याला जेवू घालण्यासाठी नवरीने चक्क…; नेटकऱ्यांची मनं जिंकणारा Viral Video पाहिलात का?

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा

मुलाने दिलेल्या माहितीवरून त्याचे वय १६ वर्ष असून तो गाडी चालवण्याचा परवाना (लायसन्स) नसतानाही गाडी चालवत असल्याचे समजते. १६ वर्षावरील मुलांना गाडी चालवण्याची परवानगी आहे ना असा प्रश्न तो ट्रॅफिक पोलिसांना विचारतो, त्यावर १६ वर्षावरील मुलांना फक्त इलेक्ट्रिक स्कूटर तेही नियंत्रित वेगात चालवण्याची परवानगी असल्याचे ते ट्रॅफिक पोलीस स्पष्ट करतात. यानंतर जोपर्यंत मुलाचे पालक येत नाहीत तोपर्यंत त्याला जाता येणार नाही असे पोलीस अधिकारी सांगतात. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दीपांशू काब्रा यांनी पालकांनी याबाबत अधिक जागृक राहण्याचा सल्ला दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 12:40 IST
Next Story
Video: भर लग्नमंडपात घुसला संतापलेला बैल; अडवायला गेलेल्या माणसावर हल्ला करत त्याला फेकून दिले अन..