Gold-Silver Price on Monday, 3 October 2022 In Maharashtra. | Loksatta

Gold-Silver Price on 3 October 2022: ग्राहकांना दिलासा! सोने-चांदीच्या दरांमध्ये आजही वाढ नाही; जाणून घ्या किंमत

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Gold-Silver Price on 3 October 2022: ग्राहकांना दिलासा! सोने-चांदीच्या दरांमध्ये आजही वाढ नाही; जाणून घ्या किंमत
प्रतिनिधिक छायाचित्र

Gold- Silver Price Today : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४६,५०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५६,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ५६,९०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,६५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,७३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,५३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,७६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,५३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,७६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,५३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,७६० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५६९ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

विश्लेषण : सोन्याची किंमत ठरते कशी? नेमके कोणते घटक ठरतात कारणीभूत? जाणून घ्या सविस्तर!

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Gold-Silver Price on 2 October 2022: सोने-चांदीच्या दरातील घसरण सुरूच; आज किती रुपयांनी कमी झाली किंमत, जाणून घ्या

संबंधित बातम्या

Gold-Silver Rate Today: आठवड्याच्या सुरवातील सोन्याचे भाव झाले कमी, तर चांदीचे दरही घसरले; जाणून घ्या आजचा भाव
Gold-Silver Price on 1 August 2022: सोने-चांदीचे भाव स्थिर; जाणून घ्या, राज्यातील आजचे दर
Gold-Silver Price on 5 August 2022: आज सोने-चांदीचा भाव काय? जाणून घ्या
जगभरात बँकांकडून व्याजदर वाढीचे सत्र ; ‘फेड’पाठोपाठ बँक ऑफ इंग्लंड, स्विस बँकेकडून वाढ

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Airplane Mode म्हणजे काय? फ्लाइट मोड चालू करणं कधी असतं गरजेचं? जाणून घ्या
“तोंड आवरा, पुन्हा आरामाची वेळ येऊ नये” देसाईंच्या इशाऱ्यानंतर राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “महाराष्ट्राची बाजू लढणारे…”
PAK vs ENG Test Series: ‘ओ भाई, आप चेअरमैन हैं’, पाकिस्तानच्या पराभवानंतर रमीझ राजावर भडकला शोएब अख्तर
“सावरकरांच्या सल्ल्यानुसारच….”; शरद पोंक्षेंचे लता मंगेशकर यांच्याबद्दल वक्तव्य
IND vs BAN 2nd ODI: ‘जाळ अन् धूर संगटच…’ १५१ किमी उमरान मलिकचा वेग अन स्टंप हवेत उडाला पाहा video