दररोज अनेक जण नोकरीच्या विविध संधी शोधत असतात. तसेच अनेकांकडून सर्वोत्तम नोकऱ्यांची माहिती घेत असतात. तुम्हीही त्यांच्यापैकीच एक असाल, तर वर्ष २०२४ मधील सर्वोत्तम जॉब्स / नोकऱ्या कोणत्या आहेत याची एक यादी इन्डीड नावाच्या प्लॅटफॉर्मने शेअर केल्याची माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या एका लेखावरून मिळते.

त्यानुसार तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग, सोशल मीडिया, वित्त, तसेच थेरपी या सर्व क्षेत्रांमध्ये यंदा नोकरीसाठी उत्तम संधी असल्याचे समजते. इन्डीडने नोकऱ्यांची उपलब्धता, पगार, ऑपॉर्च्युनिटी ग्रोथ, तसेच घरून किंवा हायब्रीड नोकरीच्या संधींचा एकंदरीत अभ्यास करून ही यादी प्रसिद्ध केली असल्याची माहिती मिळते. त्यामध्ये कोणकोणत्या नोकऱ्या आहेत त्या पाहा.

हेही वाचा : ESIC Pune recruitment 2024 : पुण्यामध्ये ‘या’ संस्थेत होणार वॉकइन इंटरव्ह्यू! तारीख, संस्था जाणून घ्या

भारतातील सर्वोत्तम नोकऱ्यांची यादी

अभ्यासानुसार यामध्ये

पहिल्या क्रमांकावर ‘सीनियर इंजिनियर’ नोकरी आहे आणि त्यामध्ये उमेदवाराला नऊ लाख १२ हजार ३०७ रुपये इतके सरासरी वेतन दिले जाते. त्याखालोखाल ‘ऑपरेशन्स लीड’ हे पद धारणकर्त्या उमेदवारास साधारण सात लाख नऊ हजार ८५५ रुपयांपर्यंत वेतन मिळते. तिसऱ्या क्रमांकावर चक्क सोशल मीडिया मॅनेजर ही नोकरी येते. त्यामध्ये उमेदवाराला सरासरी चार लाख ४७ हजार १४० रुपये वेतन दिले जाते. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरील बिझनेस मॅनेजर या पदावरील उमेदवारास सरासरी पाच लाख २७ हजार ६२१ रुपये वेतन मिळते. पाचव्या क्रमांकावरच्या फायनान्स मॅनेजर पदावर असणाऱ्या उमेदवारास सरासरी आठ लाख चार हजार ५९९ रुपये इतके वेतन मिळते.

हेही वाचा : Manmad Nagar Parishad recruitment 2024 : मनमाड नगर परिषदेत नोकरीची संधी! अर्ज प्रक्रिया पाहा

याव्यतिरिक्त सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्यांमध्ये अकाउंटिंग मॅनेजर, असिस्टंट लीडर, वरिष्ठ अभियंता, क्लस्टर मॅनेजर, सप्लाय चेन मॅनेजर, फायनान्स मॅनेजर इत्यादी पदांचा समावेश आहे. त्यामध्ये उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न सरासरी आठ ते नऊ लाखांदरम्यान असू शकते.

या यादीमध्ये सीनियर नेट डेव्हलपर आणि सीनियर इंजिनीयर अशा दोनच तांत्रिक भूमिकांचा समावेश आहे.

अनेक तंत्रज्ञान कंपन्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन काम करण्याबाबत विचारत असताना, मीडिया आणि मार्केटिंगमधील परफॉर्मन्स मॅनेजर, सोशल मीडिया मॅनेजर व कंटेंट मॅनेजर यांसारख्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिमोट कामासाठी अधिक पर्याय उपलब्ध आहेत, अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेसच्या लेखावरून हाती आली आहे.

तुम्हीदेखील उत्तम पगार असणाऱ्या नोकरीच्या शोधात असल्यास वरील यादी वाचून तुम्ही कोणत्या क्षेत्रात कार्य शकता ते पाहा.