Former UP CM and Samajwadi Party leader Mulayam Singh Yadav is currently admitted to the Critical Care Unit msr 87 | Loksatta

मुलायमसिंह यादव यांची प्रकृती खालावली; ICU मधून आता CCU मध्ये केलं दाखल

पुढील २४ तास अधिक महत्त्वाचे; गुरुग्राममधील मेदांता रूग्णालयाने जारी केले पत्रक

मुलायमसिंह यादव यांची प्रकृती खालावली; ICU मधून आता CCU मध्ये केलं दाखल
(संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची प्रकृती काल (रविवार) बिघडली. यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांची तब्येत आणखी खालावल्याने त्यांना आयसीयू मधून आता क्रिटिकल केअर यूनिट(सीसीयू)मध्ये हलवण्यात आलं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगरानीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवाय, पुढील २४ तास हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाने मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यासाठी पत्रक जारी केलं आहे. शिवाय रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईन लक्ष ठेवून आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत अखिलेश यादव यांच्याकडे विचारपूस केली आहे. तसेच, पंतप्रधांन मोदींनी अखिलेश यांना जी काही मदत आवश्यक असेल ती सर्व करू, असेही सांगितले आहे.

याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे.“उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच मी त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव यांना फोन करून विचारपूस केली. ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की ते लवकरात लवकरक बरे व्हावेत.” असं राजनाथ सिंह यांनी ट्वीट द्वार सांगितले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथा यांनीही अखिलेश यादव यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केल्याचेही समोर आले आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
शेतात विवस्र आढळलेल्या मुलीचा मृतदेह घेऊन पोलिसांनी काढला पळ, ‘यूपी’तील घटनेचा धक्कादायक VIDEO

संबंधित बातम्या

Gujarat Election Results 2022 Live :…हे लोकशाहीसाठी घातक, नाना पटोलेंनी मांडलं स्पष्ट मत; वाचा प्रत्येक अपडेट
Himachal Pradesh Election Results 2022 Live : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची मुसंडी, भाजपा पिछाडीवर, जाणून घ्या निकाल
World’s Richest Person: एलॉन मस्क यांची मत्तेदारी मोडीत; ‘या’ व्यक्तीने पहिल्या स्थानावर घेतली उडी
“हिंमत असेल तर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधा”, आफताबचं पोलिसांना खुलं आव्हान, खूनाचं कारणही सांगितलं
Himachal Pradesh Election Results 2022: हिमाचल प्रदेशमध्ये हालचालींना वेग; विनोद तावडेंवर बेरजेच्या गणिताची जबाबदारी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: नकली पोशाख घालून ‘तो’ चक्क मगरीजवळ जाऊन झोपला; तिचा पाय ओढला अन् तितक्यात…अंगावर काटा आणेल ‘हा’ क्षण
गुजरात राज्यात ‘आप’चा प्रवेश, राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारुपाला येणार? मनिष सिसोदिया म्हणाले “संपूर्ण देशाला…”
गुजरात निवडणूक निकालावर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “ड्रग्जची आयात…”
IND vs BAN: टीम इंडियाच्या पराभवानंतर बीसीसीआयने दिले कारवाईचे संकेत, बांगलादेश दौऱ्यानंतर घेणार मोठे निर्णय
रेल्वे प्रवासात बिनधास्त झोपा, स्टेशन आल्यावर तुम्हाला जाग करण्यासाठी रेल्वेच करणार फोन; जाणून घ्या काय आहे सुविधा