Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

मुलायम सिंह यादव

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्याचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी झाला. लहानपणापासून त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. त्यांनी बीए, बीटी आणिएमए अशा पदव्या मिळवल्या आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये ते उत्तर प्रदेश राज्यातील कर्नाल या ठिकाणच्या एका विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करत होते. राम मनोहर लोहिया आणि राम नारायण अशा नेत्यांकडून त्यांनी राजकारणाचे, समाजकारणाचे धडे गिरवले. पुढे १९६७ मध्ये ते उत्तर प्रदेशच्या विधानसभेत विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. आणीबाणीच्या काळामध्ये त्यांना अटक झाली होती.

१९८९ मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. आत्तापर्यंच तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. एच टी देवेगौडा सरकारमध्ये त्यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. १९९२ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. उत्तर प्रदेश राज्यामध्ये हा सर्वात मोठा पक्ष मानला जातो. बरीच वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या मुलायम सिंह यादव हे २०२२ मध्ये आजारी पडले. यातच त्यांचा अंत झाला. १० ऑक्टोबर २०२२ रोजी गुरुग्राममध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर समाजवादी पार्टीची जबाबदारी त्यांच्या मुलाच्या, अखिलेश यादव यांच्या खांद्यांवर पडली आहे.
Read More
लोहिया ते अखिलेश व्हाया मुलायम! उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी राजकारणाचा प्रवास कसा झालाय? प्रीमियम स्टोरी

समाजवादी विचारसरणीच्या राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी नेहमीच ‘सामाजिक न्याया’चा आग्रह धरला आहे. मात्र, या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने भारतीय राजकारणाच्या…

Uttar Pradesh Loksabha Election 2024 Aditi Yadav Akhilesh Dimple Yadav daughter
अखिलेश यादवांच्या मुलीने प्रचारसभांमध्ये वेधले लक्ष; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अदिती? प्रीमियम स्टोरी

आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी भारतात आलेली अदिती उत्तर प्रदेशमधील कडक तापमानामध्ये आपल्या आईचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरली आहे.

atal bihari vajpayee government collapse by one vote marathi
१९९९ चा सत्तासंघर्ष: वाजपेयींचं सरकार एका मतानं कुणामुळे पडलं? शरद पवार, गिरधर गमांग की मायावती? प्रीमियम स्टोरी

१९९६ ते १९९९ या चार वर्षांत देशानं तीन निवडणुका, पाच पंतप्रधान व किमान डझनभर पक्षांच्या युतींची सरकारं अनुभवली! काय घडत…

KCR's daughter K Kavitha launches dharna over Women's Reservation Bill
महिला आरक्षणाच्या विरोधात असलेल्या सपा, आरजेडी पक्षाचाही आता या विधेयकाला पाठिंबा

महिला आरक्षण विधेयकाच्या २७ वर्षांच्या प्रवासात आतापर्यंत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल या विधेयकाला विरोध करत होते. आता ते…

mulayam singh yadav akhilesh yadav
समाजवादी पक्षाच्या प्रचारगीतामध्ये मुलायम सिंहांची तुलना देवाशी; तर अखिलेश यादव यांना म्हटले भीष्म व कर्ण

एकीकडे सपाकडून रामचरितमानसच्या प्रती जाळण्यात येत आहेत. तर दुसरीकडेच त्याच रामाशी मुलायमसिंह यांची तुलना करण्यात येत आहे.

Shivsena and Modi
“अयोध्येत कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो, पण…” वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत शिवसेनेचे मोदी सरकारवर टीकास्त्र!

“…ते ऋण फेडण्याठीच मुलायमसिंग यांना पद्मविभूषणाने सन्मानित केले काय?” असा सवालही केला आहे.

dv mulayam singh yadav funeral
मुलायमसिंह यादव यांना अखेरचा निरोप; सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

समाजवादी पक्षाचे संस्थापक, माजी संरक्षण मंत्री, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी त्यांच्या…

Samajwadi Party founder Mulayam Singh Yadav passed away
समाजवादकेंद्री राजकारणातील नेता हरपला ; मुलायमसिंह यादव यांचे निधन

समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मुलायमसिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले.

Mulayam singh yadav
अग्रलेख : सरंजामी समाजवादी!

मुलायमसिंह हे समाजवादी काँग्रेसविरोधी राजकारणात यशस्वी ; तरी ते मुख्य प्रवाहाच्या काठावरचेच. नंतर तर काँग्रेसविरोधही नाममात्रच उरला..

atul bhatkhalkar and mulayam singh yadav death
अतुल भातखळकर यांचे आक्षेपार्ह ट्वीट, मुलायमसिंह यादव यांचे नाव घेत म्हणाले “कारसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्या…”

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, तथा समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे आज (१० ऑक्टोबर) ८२ व्या वर्षी निधन झाले.

संबंधित बातम्या