आर्थिक दुष्टचक्रात अडकलेला पाकिस्तान धान्य टंचाईसह महागाईचा सामना करत आहे. पाकिस्तानला कोणीही मदत करण्यास तयार नाही आहे. त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. अशातच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताबद्दल विधान केलं आहे. आम्ही ( पाकिस्तान ) भारताबरोबर तीन युद्ध लढली आहेत. त्यामुळे पाकिस्तानला धडा मिळाला आहे, असं विधान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अल अरेबिया या वृत्तवाहिनीला पंतप्रधान शरीफ यांनी मुलाखत दिली. तेव्हा बोलताना शरीफ यांनी म्हटलं, “भारत आणि पाकिस्तान शेजारी देश असून, एकमेकांबरोबर राहायला हवं. दोन्ही देशांनी शांततेत राहायचं, प्रगती करायची की भांडून संसाधने आणि वेळ वाया घालवायचा ठरवायला हवं. भारताबरोबर तीन युद्ध झाल्याने गरिबी आणि बेरोजगारीला आम्ही सामोरे जात आहे. तसेच, यातून धडा शिकलो आहोत. आता आम्हाला शांततेत जगायचं असून, समस्या सोडवायच्या आहेत,” असं शरीफ यांनी नमूद केलं.

हेही वाचा : लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की जागतिक दहशतावादी म्हणून घोषित

“काश्मीरमध्ये जे काही चालले आहे, ते…”

“पाकिस्तानला गरिबी संपवायची आहे. देशात आनंदाचे वातावरण तयार करायचं आहे. आमच्या लोकांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार द्यायच्या आहेत. आमची संसाधने बॉम्ब आणि दारुगोळ्यावर खर्च करायची नाही. तसेच, काश्मीरमध्ये जे काही चालले आहे, ते थांबलं पाहिजे, हाच पंतप्रधान नरेंद्र मोदींना संदेश आहे,” असं शरीफ यांनी म्हटलं.

हेही वाचा : दाऊदचा पाकिस्तानमधला ठावठिकाणा कळला, त्याने दुसरं लग्नही केलं; NIA च्या चौकशीत दाऊदच्या भाच्याचे धक्कादायक खुलासे

“भारत आणि पाकिस्तानला एकत्र आणण्यासाठी…”

“पाकिस्तानजवळ इंजिनीअर्स, डॉक्टर्स आणि कामगार आहेत. याचा वापर आम्ही पाकिस्तानच्या समृद्धीसाठी करु इच्छित आहे. त्यामुळे दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित होत, प्रगती करेल. तसेच, भारत आणि पाकिस्तानला एकत्र आणण्यासाठी संयुक्त अरब अमिराती महत्वाची भूमिका बजावू शकतं,” असेही पंतप्रधान शरीफ म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan has learnt its lesson pm shehbaz sharif on wars with india ssa
First published on: 17-01-2023 at 11:19 IST