संयुक्त राष्ट्राने लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. या निर्णयानंतर अब्दुल मक्कीची संपत्ती जप्त करण्यात येणार असून प्रवासबंदी तसेच शस्त्र बाळगण्यावर बंदी असे निर्बंध त्याच्यावर लादण्यात येणार आहेत. दहशतवादी कारवायांना रोखण्याच्या प्रयत्नात भारताला हे मोठे यश मिळाल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >>> ललित मोदींनी मागितली मुकुल रोहतगींची जाहीर माफी, आईचा उल्लेख करत म्हणाले; “रागाच्या भरात…”

Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
pm modi slams congress chief mallikarjun kharge over his remark on article 370
खरगेंची मानसिकता तुकडे-तुकडे टोळीची! अनुच्छेद ३७०वरून पंतप्रधान मोदींची टीका
vladimir putin
“इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून मॉस्कोत दहशतवादी हल्ला”, पुतिन यांचं वक्तव्य; युक्रेनचा उल्लेख करत म्हणाले…
Isreal war
गाझामधील युद्धविरामासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेत प्रस्ताव मंजूर, ‘या’ देशाचा मात्र नकार

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अल कायदा निर्बंध समितीने अब्दुल मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. मक्की हा लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफीज मोहम्मह सईद याचा मोहुणा आहे. ही घोषणा करताना “मक्की तसेच एलईटी, जेयूडी संघटनेतील लोक दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे, संघटनेत तरुणांची भरती करणे, तरुणांना हिंसा करण्यास भडकावणे, भारतात दहशतवादी हल्ले घडवणे अशा कारवायांत सहभागी आहेत,” असे निरीक्षण संयुक्त राष्ट्राने नोंदवले.

हेही वाचा >> Video : ती कुत्र्यांना खायला देत होती अन्..; चंदीगढमधील अपघाताचं थरकाप उडवणारं CCTV फूटेज आलं समोर; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप

मक्कीला दहशतवादी म्हणून घोषित केले जावे, अशी भारताची पूर्वीपासूनची मागणी आहे. मात्र या मागणीला चीनने याआधी विरोध केलेला आहे. मागील वर्षी जून महिन्यात अमेरिका आणि भारताने मक्कीला दहशतवादी घोषित करावे, अशा मागणीचे संयुक्त निवेदन दिले होते. मात्र चीनने ऐनवेळी या मागणीला विरोध केला होता. मात्र आता भारताच्या प्रयत्नांना यश आले असून मक्कीला आता जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे.